Aaditya Thackeray Biography in Marathi – आदित्य ठाकरे यांच्या विषयी माहिती
आपण सर्वाना माहित आहे, मा. श्री. आदित्य ठाकरे हे शिवसेना-संस्थापक श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांचे पुत्र आहेत.
आदित्य ठाकरेसाहेब हे एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या महाराष्ट्रातील पर्यटन व पर्यावरण सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते मुंबई, महाराष्ट्रातील महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आहेत.
हे पण वाचा : संत गाडगे बाबा यांचे सुविचार
ते शिवसेनेच्या युवा संघटनेचे युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. ३० डिसेंबर २०१९ रोजी त्यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली आहे.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : मार्क ज़ुकेरबर्ग फेसबुक चे मालक
आज आपण आदित्य ठाकरे यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म(Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब(Family)? त्यांचे शिक्षण(Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.
आदित्य ठाकरे यांचे जीवनचरित्र – Aaditya Thackeray information in Marathi(Biography, Life, Age, Education, Family, House, Awards)
अंक (Points) | माहिती (Information) |
---|---|
पूर्ण नाव (Name) | आदित्य उद्धव ठाकरे |
अन्य नाव | – |
जन्म(Born) | १३ जून, १९९० |
जन्मस्थान(Birthplace) | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय(Age) | २०२० पर्यंत वय वर्ष २९ |
निवासस्थान | मातोश्री, वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वडिलांचे नाव | उद्धव ठाकरे |
आईचे नाव | रश्मीताई ठाकरे |
भाऊ-बहीण | तेजस ठाकरे |
पत्नीचे नाव (Wife Name) | – |
अपत्ये | – |
शिक्षण | एलएलबी पदवी |
कार्यक्षेत्र | राजकारण |
राजकीय पक्ष | शिवसेना |
हुद्दा | आमदार, वरळी |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
नातेवाईक | राजसाहेब ठाकरे (काका) |
धर्म | हिंदू |
राष्ट्रीयत्व / नागरिकत्व | भारतीय |
सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Aaditya Thackeray Early Life Information in Marathi
आदित्य ठाकरे यांचा जन्म १३ जून, १९९० रोजी मुंबई मध्ये झाला. त्यांचे वडील उद्धव ठाकरेसाहेब आणि आई रश्मीताई ठाकरे यांचा मोठा मुलगा आहे. आदित्य यांच्या लहान भावाचे नाव तेजस ठाकरे आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आदित्य यांचे आजोबा आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष व संस्थापक राजसाहेब ठाकरे हे आदित्य यांचे चुलते आहेत.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित
आदित्य ठाकरे शिक्षण – Aaditya Thackeray Education in Marathi
त्यांनी मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत असताना बीए इतिहास पदवी मिळविली.
त्यानंतर त्यांनी के सी लॉ कॉलेज मधून मास्टर डिग्री घेऊन एलएलबी पदवी मिळविली.
आदित्य ठाकरे व्यवसाय – Aaditya Thackeray Political career, work
२००७ मध्ये ‘माय थॉट्स इन व्हाईट अॅन्ड ब्लॅक’ हे त्यांचे पहिले कविता पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतरच्याच वर्षी त्यांनी गीतकार केले आणि उम्मीद या खासगी अल्बमचे प्रकाशन केले ज्यासाठी त्यांनी आठ गाणी लिहिली.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेसाहेब यांच्या विषयी माहिती
ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी मुंबईच्या वरळी मतदारसंघातून २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आमदारकीसाठी निवडणूक लढविली आणि त्यानंतर ते विजयी झाले.
ते निवडणूक लढविणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्यही ठरले. ते ३० डिसेंबर २०१९ रोजी शिवसेना सरकारमध्ये पर्यटन, प्रोटोकॉल आणि पर्यावरणाचे कॅबिनेट मंत्री झाले.
आदित्य ठाकरे यांची एकूण मालमत्ता – Aaditya Thackeray car, bike, net worth in Marathi
त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती आहे. १० कोटी ३६ लाख रुपये बँकेत जमा केले आहेत.
त्यांच्याकडे २ व्यावसायिक स्टोअर्स आहेत आणि कर्जतकडेही काही एकर जमीन आहे. आदित्य ठाकरे हे BMW कार चे मालक आहेत. जवळपास त्यांच्याकडे १६ ते १७ करोड ची प्रॉपर्टी आहे.
आदित्य ठाकरे यांची राजकीय वाटचाल थोडक्यात – Aaditya Thackeray political short info
- २०१०: युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त
- २०१७: मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
- २०१८: शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्त
- २०१९: वरळी मतदार संघाचे आमदार
- २०१९: महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण, पर्यटन आणि प्रोटोकॉल मंत्री कॅबिनेट
- २०२०: मुंबई उपनगरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त
अधिकृत सोशल मीडिया खाते – Aaditya Thackeray Official Social media accounts
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/adityathackeray
फेसबुक : https://www.facebook.com/AadityaUThackeray
ट्विटर : https://twitter.com/AUThackeray
Read More info : Aaditya Thackeray Wiki info
अशा प्रकारे आज आपण आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏