आर्या आंबेकर यांचे जीवनचरित्र – Aarya Ambekar Biography in Marathi
आर्या अंबेकर एक मराठी पार्श्वगायक आणि नागपूर, महाराष्ट्रातील अभिनेत्री आहे. अर्याने जानेवारी २०१७ मध्ये “ती सध्या काय करते” या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले आहे.
झी मराठी वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ दरम्यान सा रे ग म प मराठी लिटल चॅम्प्स मध्ये पहिल्या सिझनला अंतिम फेरी गाठली.
आर्या आंबेकर यांचे जीवनचरित्र – Aarya Ambekar Short Biography in Marathi
पूर्ण नाव | आर्या आंबेकर |
जन्म | जून १६, १९९४ |
जन्मस्थान | नागपूर, महाराष्ट्र, भारत |
मूळ_गाव | पुणे |
वडिलांचे नाव | समीर आंबेकर |
आईचे नाव | श्रुती आंबेकर |
पतीचे नाव | – |
कार्यक्षेत्र | पार्श्वगायन |
गुरू | श्रुती आंबेकर |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्लिश |
पुरस्कार | बिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड |
धर्म | हिंदू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
सुरुवातीचे जीवन – Aarya Ambekar Life
आर्यचा जन्म जून १६, १९९४ रोजी नागपुरात झाला. त्यांचे वडील समीर आंबेकर (डॉक्टर) आणि आई श्रुती आंबेकर गायक.
आर्याची आजी, एक क्लासिकल गायकी, जेव्हा आर्या दोन वर्षांची असताना आर्या मधील प्रतिभा त्यांनी ओळखली.
आर्याने तिचे गुरु आणि आई श्रुती आंबेकर यांच्या कडून वयाच्या साडेपाच वर्षांच्या असताना संगीताचे प्रशिक्षण चालू केले.
वयाच्या सहाव्या वर्षी पहिल्या इयत्तेत असताना आर्याने संगीतात पहिली परीक्षा दिली.
तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले.
आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत.
२०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरवात केली. यामध्ये तिने गायलेले हृदयात वाजे समथिंग हे गाणे प्रसिद्ध आहे.
कारकीर्द – Aarya Ambekar Career
सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा एक संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रम, झी मराठी या दूरदर्शन वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या कालावधीत प्रसारित झाला.
या कार्यक्रमासाठी वय वर्ष ८ ते १४ मधील मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली.
आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती.
आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. तिच्या पान खाये सैंया हमारो या गाण्याला परीक्षकांकडून वरचा नी पर्यंत (२०० %) गुण मिळाले.
हा विक्रम सा रे ग म प च्या त्या आधीच्या ८ पर्वात अबाधित होता. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत गायक हरिहरन हे त्या भागाचे परीक्षक होते.
मराठी चित्रपट
- लेटस् गो बॅक
- बालगंधर्व
- कळी या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीनिवास खळे यांनी १५ वर्षांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.
- रमा माधव – हमांमा रे पोरा या गाण्याची पार्श्वगायिका
- योद्धा
- संत कैकडी महाराज – संगीतकार: नरेंद्र भिडे
- गोष्ट तिच्या प्रेमाची
- रेडी मिक्स – संगीतकार: अविनाश विश्वजीत
पुरस्कार आर्या आंबेकर- Aarya Ambekar Awards and Recognitions
- माणिक वर्मा शिष्यवृत्ती – २००८
- उप-विजेती, झी मराठी सा.रे.ग.म.प. लिटिल चॅम्प्स – २००९
- हरिभाऊ साने पुरस्कार – २०१०
- पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार – २०१०
- बिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड (संगीत) – २०११
- यंग अचिवर्स ॲवॉर्ड – विसलींग वूड्स ईंटरनॅशनल – २०१२
- डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार – २०१२
- आर्या पुरस्कार – २०१४
- डॉ. उषा (अत्रे) वाघ पुरस्कार – २०१५
- विद्या प्राज्ञ पुरस्कार – ग. दि. मा. प्रतिष्ठान द्वारा – २०१६
- गोद्रेज फ्रेश फेस ऑफ द इअर – सह्याद्री नवरत्न ॲवॉर्डस् – २०१७
- फेव्हरेट पार्श्वगायीका, ती सध्या काय करते चित्रपटातील ‘हृद्यात वाजे समथिंग’ या गाण्यासाठी – झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या मध्ये – २०१९
- फेव्हरेट नवोदित अभिनेत्री, ती सध्या काय करते चित्रपटासाठी – झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या मध्ये – २०१९
- मोस्ट नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इअर – झी चित्रगौरव पुरस्कार – २०१८
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीका व सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री, ती सध्या काय करते चित्रपटासाठी – रेडीओ सिटी द्वारा सिटी सिने अवॉर्डस् मराठी – २०१८
- सूर ज्योत्सना राष्ट्रीय संगीत पुरस्कार – २०१९
More info : Wiki
अशा प्रकारे आज आपण आर्या आंबेकर(Aarya Ambekar Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली. हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏