in ,

महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती – Mahatma Jyotiba Phule information in Marathi

Mahatma Jyotiba Phule information in Marathi - महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती
img source : https://www.hindipanda.com/mahatma-jyotiba-phule/

Mahatma Jyotiba Phule information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती

महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले या नावाने देखील ओळखले जाते. ते एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि महाराष्ट्रातील लेखक होते.

त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, जातीव्यवस्था आणि महिलांसाठी शिक्षण अशी अनेक सामाजिक कार्य केली.

दलित जातीतील लोकांना समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. त्यामध्ये सर्व धर्म आणि जातीतील लोक या संघटनेचा एक भाग बनू शकले.

फुले यांच्या कामामध्ये त्यांच्या पत्नीचा पण खूप मोलाचा वाटा आहे. ते आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील महिला शिक्षणाचे जनक आहेत. आज भारतामध्ये ज्या मुली शिक्षण घेत आहेत, त्याचे सर्व श्रेय फुले यांना जाते.

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : भारताच्या स्वातंत्र्य साठी लढणारे महात्मा गांधी यांचे जीवन

कामगार स्त्रियांचा आणि अस्पृश्य समाजाच्या अनेक शतकांपासुन होत असलेल्या शोषणाचा, अत्याचाराचा व सामाजिक गुलामगिरीचा त्यांनी कडाडुन विरोध केला.

सावकारांविरोधात आणि नौकरशाही विरूध्द त्यांनी युध्द पुकारले. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी महात्मा फुलेंनी मुलींकरता पुणे या ठिकाणी भारतातील पहिली शाळा सुरू केली.

वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था या शोषण व्यवस्था असुन जोपर्यंत या पुर्णपणे नष्ट होत नाहीत तो पर्यंत एका समाजाची निर्मीती असंभव आहे अशी आपली रोखठोक भुमिका ठेवली.

अशी भुमिका मांडणारे ते पहिले भारतीय होते आणि म्हणुनच जातिव्यवस्था निर्मृलनाची कल्पना आणि आंदोलनाचे ते जनक ठरले.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र – Mahatma Jyotiba Phule Born, Wife, Mother name, Father Name short info

पूर्ण नाव (Name) ज्योतिराव गोविंदराव फुले
टोपणनाव जोतीबा, महात्मा
मूळ आडनाव गोऱ्हे
जन्म(Born) ११ एप्रिल १८२७
जन्मस्थान(Birthplace) कटगुण,ता.खटाव जि.सातारा,महाराष्ट्र, भारत
मृत्यू २८ नोव्हेंबर १८९०
मृत्यूस्थान पुणे, महाराष्ट्र
मूळ गाव कटगुण
वडिलांचे नाव गोविंदराव फुले
आईचे नाव चिमणाबाई फुले
भाऊ-बहीण
पत्नीचे नाव(Wife Name) सावित्रीबाई फुले
मुले यशवंत फुले

सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Mahatma Jyotiba Phule Personal Life Information

फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते यांना भाजी विक्रेते आणि फुलवाले म्हणून ओळखत होते, त्यामुळे त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे असले तरी त्यांना पुढे फुले या आडनावाने ओळखले जाऊ लागले.

त्यानंतर त्यांचे कुटुंब पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे शिफ्ट झाले. खानवडी येथे त्यांचे स्वतःचे घर आहे, फुले आडनावाची बरीच कुटुंबे त्या ठिकाणी आहेत.

उर्वरित माहिती पुढील पानावर वाचा…

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband - पंकजाताई मुंडे यांची माहिती

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband | पंकजाताई मुंडे

अथर्व अंकोलेकर Atharva Ankolekar age instagram cricket score Family Biography Wikipedia

अथर्व अंकोलेकर माहिती – Atharva Ankolekar Age Family Biography Information in Marathi