Asha Bhosle information in marathi – आशा भोसले यांची माहिती
आशा भोसले या एक भारतीय मराठी पार्श्वगायिका आणि मोट्या उदयोजक आहेत. त्यांनी मराठी, हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटात गायन केले आहे. त्यांच्याकडे गाण्याचा व्यापक भांडार आहे.
तसेच त्यांनी अनेक खाजगी अल्बम रेकॉर्ड केले आहेत आणि भारत आणि परदेशात असंख्य एकल मैफिलींमध्ये भाग घेतला आहे.
२००६ मध्ये आशा भोसले यांनी सांगितले कि, त्यांनी १२००० हुन अधिक गाणी गायली आहेत. भोसले यांच्या गायन शैलीत चित्रपट संगीत, पॉप, गझल, भजन, पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली यांचा समावेश आहे.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: लतादीदी यांची माहिती नक्की वाचा
भारत सरकारने त्यांना २००० रोजी “दादासाहेब फाळके पुरस्कार” आणि २००८ रोजी “पद्मविभूषण पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. तसेच त्यांची २०११ मध्ये “गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद झाली.
आशा भोसले यांचे जीवनचरित्र – Asha Bhosle information in marathi
जन्म नाव | आशा भोसले |
जन्म | ८ सप्टेंबर, १९३३ |
जन्मस्थान | सांगली, महाराष्ट्र, भारत |
वडिलांचे नाव | दीनानाथ मंगेशकर |
आईचे नाव | माई मंगेशकर |
पतीचे नाव | गणपत राव भोसले, दुसरा विवाह-राहुल देव बर्मन |
नातेवाईक | लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर |
अपत्ये | हेमंत, वर्षा, आनंद |
विशेषता | गायक मराठी, हिंदी |
भाषा | मराठी, हिंदी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पुरस्कार | पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार |
सुरुवातीचे जीवन – Asha Bhosle life in Marathi
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर, १९३३ साली सांगली जिल्हात, एका छोट्या गावात झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर एक अभिनेता आणि गायक होते. त्यामुळे आशा यांची लहान वयातच संगीताची ओळख झाली. वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबई मध्ये गेले. भोसले आणि त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चित्रपटांमध्ये गाणे व अभिनय करण्यास सुरवात केली.
गायनाची कारकीर्द – Asha Bhosle Career in singing
त्यांनी “माझा बाळ” या मराठी चित्रपटातून गायनाची सुरुवात केली. त्यांनी गोकुळचा राजा या मराठी चित्रपटात पार्श्वगायन केले. त्यानंतर आशा भोसले यांनी हजारो मराठी चित्रपट संगीत, भावगीत गायली आहेत.
त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली आहेत, पण त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते.
त्यामुळे त्यांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. त्यावेळी त्यांच्यावर मुलांची जबाबदारी, स्वतःच्या आयुष्यातील अडचणी, यांचा सामना करीत त्यांनी ते आव्हान स्वीकारले, आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या मराठी संगीत नाटकातील नाट्य संगीत ही आशा भोसले यांच्या आवाजात नोंदली गेली आहेत. १९५० च्या काळात आशाताई आणि लताताई ह्या मराठी चित्रपटांसाठी मुख्य पार्श्वगायिका होती.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: आर्या आंबेकर यांचे जीवनचरित
त्यांना १९६२ साली “मानिनी” या मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला.
कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले.
‘दम मारो दम’, ‘दिल चीज क्या है’, ‘मेरा कुछ सामान’ अनेक गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती – अशा लोकप्रिय मराठी गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सगळेच विलक्षण!
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत.
एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा अभिमान आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.
पुरस्कार आणि सन्मान – Asha Bhosle Awards and honors
फिल्म फेअर सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार
पद्मविभूषण पुरस्कार – २००८
चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’
भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ पुरस्कार
पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार
आशा भोसले पुरस्कार
चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणार्या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद आणि काही अन्य संस्थांच्या वतीने ’आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो.
एक लाख अकरा हजार रुपये रोख व एक स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अधिकृत सोशल मीडिया खाते – Asha Bhosle Twitter, facebook, instagram Official Social media accounts
ट्विटर : https://twitter.com/ashabhosle/
फेसबुक : https://www.facebook.com/ashabhosleofficialpage/
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/asha.bhosle/
अशा प्रकारे आज आपण आशा भोसले(Asha Bhosle Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏
Read More info at : Wiki