in ,

बाबा आमटे यांच्या विषयी माहिती – Baba Amte Biography in Marathi

बाबा आमटे यांच्या विषयी माहिती - Baba Amte Biography in Marathi
img source : https://asnlive.in/baba-amte-social-worker/

Baba Amte Biography in Marathi | बाबा आमटे यांच्या विषयी माहिती

मुरलीधर देवीदास आमटे, सामान्यत: लोक त्यांना बाबा आमटे या नावाने ओळखतात, बाबा हे नाव त्यांना त्यांच्या आईवडिलांनीच ठेवले.

हे एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते होते. बाबांनी केलेले समाजसेवेचे कार्य फार मोठे आहे. विशेषतः कुष्ठरोगग्रस्तांच्या पुनर्वसन आणि सशक्तीकरणाच्या कार्यासाठी ते परिचित होते.

समाजसेवेचा वसा बाबांनी लहानपणापासूनच घेतला होता. रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्या कार्याचा आदर्श त्यांनी डोळ्यासामोर ठेवूनच त्यांनी समाजसेवेचे धडे गिरवले.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : गाडगे महाराज यांची माहिती

त्यांना पद्मविभूषण, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, गांधी पीस पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कार आणि जमनालाल बजाज पुरस्कार यासह अनेक पुरस्कार व बक्षिसे मिळाली आहेत.

बाबा आमटे यांचे जीवनचरित्र – Baba Amte information, Biography, Son, Life, Age, Education, Family, Anandvan, Awards

अंक (Points) माहिती (Information)
पूर्ण नाव (Name) मुरलीधर देवीदास आमटे
अन्य नाव बाबा आमटे
जन्म(Born) २६ डिसेंबर १९१४
जन्मस्थान(Birthplace) हिंगणघाट, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ९ फेब्रुवारी २००८
निवासस्थान आनंदवन, चंद्रपूर जिल्हा
वडिलांचे नाव देवीदास
आईचे नाव
भाऊ-बहीण
पत्नीचे नाव (Wife Name) साधनाताई आमटे
अपत्ये प्रकाश आमटे, विकास आमटे
शिक्षण बी.ए., एल्‌एल.बी.

सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Baba Amte Personal Life Information

बाबा आमटे उर्फ़ मुरलीधर देविदास आमटे या थोर कर्तृत्ववान, समाजसेवक पुरुषाचा जन्म ब्राह्मण कुटुंबात २४ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणेघाट, वर्धा, चंद्रपूर येथे झाला.

त्यांचे वडील देविदास आमटे हे जिल्हा प्रशासन व महसूल वसुली विभागात काम करणारे ब्रिटीश शासकीय अधिकारी होते. आमटे हे आठ मुलांमध्ये थोरले होते. एक श्रीमंत जमीन मालकाचा मोठा मुलगा म्हणून त्यांचे बालपण सुखात गेले.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित

त्यांना रेसर कार चालवण्याची आवड होती म्हणून त्यांना स्पोर्ट्स कार देण्यात आली. नागपूर मधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, पुढे त्यांनी १९३४ साली बी.ए. आणि १९३६ साली एल्‌एल.बी. ची पदवी नागपूर विद्यापीठातून घेतली.

बाबा आमटे यांचा विवाह – Baba Amte Marriage

त्यांच्या पत्नी म्हणजेच पुर्वाश्रमीच्या साधनाताई गुळेशास्त्री यांना बाबांनी एका लग्न समारंभात वयस्कर नौकराच्या मदतीला लग्न समारंभ सोडून धावून जाताना पाहिले.

बाबांना साधनाताईंची मदत करण्याची वृत्ती भावली. त्यांना असे वाटले की त्यांना आपण आपली पत्नी म्हणून निवड करावी.

म्हणून त्यांनी साधनाताईंच्या आईवडिलांकडे त्यांना मागणी घातली आणि त्यांच्या घरच्यांनीही लग्नाला चटकन होकार दिला व अशा रितीने त्यांचे १९४६ साली लग्न झाले. त्यांच्या मुलांचे नाव प्रकाश आणि विकास आमटे आहेत.

गांधीजींनी अभय साधक असे नाव दिले.

१९४२ च्या सुमारास एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते.

त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्‍न केला. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले.

त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना “अभय साधक” अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.

बाबा आमटे यांचे कार्य, भूमिका – Baba Amte anandvan

अंक (Points) माहिती (Information)
कार्यक्षेत्र सामाजिक कार्यकर्ते
मुख्य काम कुष्ठरुग्णांची सेवा,
वन्य जीवन संरक्षण,
आनंदवन
भाषा मराठी
पुरस्कार डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार,
रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
पद्मश्री,
पद्मविभूषण,
महाराष्ट्रभूषण,
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय

बाबा आमटे आनंदवन – Baba Amte anandvan

आमटे यांनी महाराष्ट्रात कुष्ठरोगी रुग्ण, अपंग लोक आणि समाजातील दुर्लक्षित लोकांचे उपचार आणि पुनर्वसन यासाठी आश्रमांची स्थापना केली.

१५ ऑगस्ट १९४९ रोजी त्यांनी आणि त्यांची पत्नी साधना आमटे यांनी आनंदवनात एका झाडाखाली कुष्ठरोग रुग्णालय सुरू केले.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित

आनंदवन म्हणजे असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था आहे.

आनंदवन ही त्यांनी उभारलेले कुष्ठरोग्यांसाठीचे घर १९५१ साली अधिकृत करण्यात आले आणि सरकारने त्यांना आनंदवनाच्या विस्तारासाठी काही भूखंडही दिला.

यानंतर २ रुग्णालये, १ विद्यापीठ, १ अनाथाश्रम, अंध आणि मूकबधिर मुलांसाठी तसेच तांत्रिकी प्रशिक्षणासाठी १ शाळा इत्यादींची स्थापना या आनंदवनात नव्याने झाली. महारोगी सेवा समितीची स्थापना देखील त्यांनी दरम्याननच्या काळात केली.

२००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.

लोकबिरादरी प्रकल्प – Lok Biradari Prakalp

१९७३ मध्ये भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.

गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व स्नुषा डॉ. मंदाकिनी आमटे समर्थपणे सांभाळत आहेत.

निधन – Death

संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले.

बाबांनी केलेले समाजसेवेचे कार्य हे अतिशय भव्य स्वरुपाचे आहे. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी बांधलेले आनंदवन हे त्यांच्या मेहनतीचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

असे हे थोर पुरुष ९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. आणि संपूर्ण आनंदवनच नव्हे तर संपुर्ण भारत देशाने एक थोर समाजसेवक गमावला.

आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करीत आहेत. आजही बांबांच्या आठवणी आनंदवनात आहेत. तिथल्या लोकांमध्ये ते अजूनही जिवंत आहेत. आनंदवनात वावरताना बाबांचा सहवास जाणवतो.

पुरस्कार व गौरव – Awards and honors

बाबांना अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तबगारीचा सत्कार करण्यात आला. बाबांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे आहे. :-

आंतरराष्ट्रीय

  • सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार- १९९९
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार
  • डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका – १९८३
  • संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार – १९९८
  • आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका – १९८९
  • टेंपल्टन बहुमान, अमेरिका, – १९९०
  • पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर,- १९९१
  • पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार – १९९१
  • पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार (४ डिसेंबर २००४)
  • राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, स्वीडन – १९९१.
  • गूगल ने २६ डिसेंबर २०१८ रोजी बाबा आमटे यांच्यावरचे डूडल दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

भारतीय

  • पद्मश्री – १९७१
  • पद्मविभूषण – १९८६
  • अपंग कल्याण पुरस्कार – १९८६
  • महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुलॆ पुरस्कार – १९९८
  • गांधी शांतता पुरस्कार – १९९९
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार – २००४
  • मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार – १९८५
  • पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार – १९८६
  • महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार – १९७४
  • राष्ट्रीय भूषण पुरस्कार – १९७८
  • जमनालाल बजाज पुरस्कार – १९७९
  • एन डी दिवाण पुरस्कार – १९८०
  • राजा राम मोहनराय पुरस्कार – १९८७
  • भरतवास पुरस्कार – २००८
  • जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार – १९८८
  • महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार – १९९१
  • कुमार गंधर्व पुरस्कार – १९९८
  • जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक – १९९८
  • डी.लिट – नागपूर विद्यापीठ – १९८०, पुणे विद्यापीठ, – १९८५-८६
  • देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) – १९८८ -विश्वभारती, शांतिनिकेतन , पश्चिम बंगाल

अधिकृत सोशल मीडिया खाते – Baba Amte Official Social media accounts

इंस्टाग्राम : माहिती उपलब्ध नाही

फेसबुक : माहिती उपलब्ध नाही

ट्विटर : माहिती उपलब्ध नाही


Read More info : Baba Amte Wiki info


अशा प्रकारे आज आपण बाबा आमटे(Baba Amte Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

Udayanraje Bhosale Biography information in Marathi

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माहिती – Udayanraje Bhosale Biography in Marathi

मुकेश अंबाणी यांच्या विषयी माहिती - Mukesh Ambani Biography in Marathi

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती – Mukesh Ambani Biography in Marathi