Bhau Kadam information in Marathi, Biography, Age, Family – भाऊ कदम यांची माहिती
आपण सगळे त्यांना भाऊ कदम नावाने ओळखतो पण त्यांचे खरे नाव भालचंद्र कदम( Bhalchandra Kadam) आहे. महाराष्टातील लोकांना आपल्या अभिनयातून हसवणारे भाऊ कदम हे एक मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते आहेत आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत.
१९९१ मध्ये त्यांनी नाटकांतून अभिनय करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्यांची अभिनय कारकीर्दीची सुरुवात झाली.
त्यांची लोकप्रियता हि “फू बाई फूच्या” टीव्ही कार्यक्रमातून झाली आणि ते त्यांच्या भूमिकेबद्दल प्रसिद्ध झाले. त्यांनी लोकांच्या मनात एक विनोदी कलाकार म्हणून घर करून घेतले.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: मकरंद अनासपुरे यांची मराठीत माहित
त्यांनी मराठी सोबत हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला आहे. ५०० पेक्षा अधिक नाटके, नऊ पेक्षा जास्त मालिका आणि चित्रपटात अभिनय केला आहे.
Bhau Kadam information in Marathi – भाऊ कदम यांची थोडक्यात माहिती
पूर्ण नाव (Name) | भालचंद्र पांडुरंग कदम |
अन्य नाव | भाऊ कदम |
जन्म (Born) | १२ जून १९७२ |
जन्मस्थान (BirthPlace) | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वडिलांचे नाव | पांडुरंग कदम |
आईचे नाव | – |
पत्नीचे नाव | ममता भालचंद्र कदम |
अपत्ये | मृण्मयी, संचिती आणि समृद्धी |
शाळा | ज्ञानेश्वर स्कूल वडाला |
भाऊ कदम यांचे वैयक्तिक जीवन / कुटुंब – Bhau Kadam family
भाऊ कदम यांचा जन्म १२ जून १९७२ साली मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी झाला. त्यांचे बालपण हे वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर ते आपल्या कुटुंबासह वडाळ्यातुन डोंबिवलीत स्थायिक झाले. ते लहानपणापासून लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: नाना पाटेकर यांची माहिती
भाऊ कदम यांनी घर खर्चासाठी पानाची टपरी चालू केली. त्यांच्या पत्नीचे नाव ममता आहे आणि त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
Bhau Kadam other info – भाऊ कदम यांची थोडक्यात माहिती
कार्यक्षेत्र | अभिनय, विनोद |
प्रमुख नाटके | करून गेलो गाव |
प्रमुख चित्रपट | टाइमपास |
भाषा | मराठी, हिंदी, |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | ‘चला हवा येऊ द्या’ |
धर्म | – |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कारकीर्द – Bhau Kadam film industry career
ते मराठीतील एक उत्कृष्ट विनोदी कलाकार आहेत. झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या मराठी स्टँडअप कॉमेडी टीव्ही शोमध्ये ते त्यांच्या स्कीट्ससाठी प्रसिद्ध आहेत.
झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात निलेश साबळे यांच्यासह ते मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत तो पप्पा, ज्योतिषी, प्रणम्य डिजिटल आणि बर्याच पात्रांची व्यक्तिरेखा साकारत असतात.
अलीकडेच या शोने 400 यशस्वी भाग पूर्ण केले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक भाग या दिग्गज कॉमेडियनने अभिनित केला आहे.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: गायत्री दातार यांची माहिती
पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० नाटकांमध्ये अभिनय केला. विजय निकम यांनी भाऊ यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. त्यामुळे तेथून त्यांच्या करिअरला एक चांगलेच वळण मिळाले.
त्यांनी “तुझं माझं जमेना” नावाच्या एका कार्यक्रमामध्ये काम केले आणि आपल्या स्किट्सचे सादरीकरण जवळजवळ प्रत्येक झी मराठी पुरस्कार समारोह कार्यक्रमात भाग घेतला आहे.
भाऊ यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात टाईमपास २, टाईमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरूद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे काही यशस्वी चित्रपटही आहेत ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
त्यांनी एका हिंदी चित्रपट “फरारी की सवारी” मध्ये देखील अभिनय केला आहे.
यांच्या काही चित्रपटांचे नाव – Bhau Kadam Marathi Movie
चित्रपट | वर्ष | भाषा |
---|---|---|
झाला बोभाटा | 2017 | मराठी |
हाफ तिकीट | 2016 | मराठी |
जाऊंद्या ना बाळासाहेब | 2016 | मराठी |
वाजलाच पाहिजे – गेम की शिनेमा | 2015 | मराठी |
टाईमपास (दोन) | 2015 | मराठी |
मिस मॅच | 2014 | मराठी |
सांगतो ऐका | 2014 | मराठी |
पुणे विरूद्ध बिहार | 2014 | मराठी |
आम्ही बोलतो मराठी | 2014 | मराठी |
बाळकडू | 2014 | मराठी |
टाईमपास | 2014 | मराठी |
नारबाची वाडी | 2013 | मराठी |
चांदी | 2013 | मराठी |
कोकणस्थ | 2013 | मराठी |
फरारी की सवारी | 2012 | हिंदी |
कुटुंब | 2012 | मराठी |
फक्त लढ म्हणा | 2011 | मराठी |
मस्त चाललंय आमचं | 2011 | मराठी |
हरिश्चंद्राची फॅक्टरी | 2010 | मराठी |
डोंबिवली फास्ट | 2005 | मराठी |
भाऊ कदम महिन्याला किती सॅलरी घेतात? – Bhau Kadam monthly income
भाऊशिवाय ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम पूर्ण होणं अशक्य आहे. सर्वांचा लाडका असलेला हा अभिनेता जवळपास अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे. (स्त्रोत)
अधिकृत सोशल मीडिया खाते – Bhau Kadam Official Social media accounts
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/bhaukadamofficial/
फेसबुक : https://www.facebook.com/bhaukadamofficial/
ट्विटर : माहिती उपलब्ध नाही
तुम्हाला दिलेली भाऊ कदम(Bhalchandra Kadam(Bhau Kadam) Biography, Age, Family, information in Marathi) यांची माहिती आवडली असेल.
हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद
Read More info at : Bhau Kadam Wiki