in ,

Bhumi Pednekar information in Marathi – भूमी पेडणेकर यांची माहिती

भूमी पेडणेकर यांची माहिती Bhumi Pednekar information in Marathi
IMG SOURCE : Bollywood Hungama / CC BY (https://creativecommons.org/licenses/by/3.0)

Bhumi Pednekar information in Marathi – भूमी पेडणेकर यांची माहिती(Biography, Life, Age, Education, Family, House, Awards)

भूमी पेडणेकर एक प्रतिभावान चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या क्षमतेने अतिशय कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

“दम लगा के हैशा” या चित्रपटासाठी त्यांना “फिल्म फेअर” पुरस्कार मिळाला. त्यांनी उत्कृष्ट अभिनय केल्या मुळे त्यांना दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार, स्टारडस्ट पुरस्कार आणि फिल्मफेअर डेब्यू पुरस्कार मिळाला आहे.

भूमी पेडणेकर यांनी आपल्या लघु कारकीर्दीत अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन आणि विक्की कौशल या नामांकित कलाकारांसोबत काम केले आहे.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : दीपिका पादुकोण बायोग्राफी मराठीत

आज आपण भूमी पेडणेकर यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म(Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब(Family)? त्यांचे शिक्षण(Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.

भूमी पेडणेकर यांचे जीवनचरित्र – Bhumi Pednekar information in Marathi(Biography, Life, Age, Education, Family, House, Awards)

अंक (Points) माहिती (Information)
पूर्ण नाव (Name) भूमी पेडणेकर
अन्य नाव
जन्म(Born) १८ जुलै, १९८९
जन्मस्थान(Birthplace) मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय(Age) २०२० पर्यंत वय वर्ष ३०
निवासस्थान
वडिलांचे नाव श्री. सतीश पेडणेकर
आईचे नाव सुमित्रा पेडणेकर
भाऊ-बहीण
पतीचे नाव (Husband Name) माहित नाही
अपत्ये माहित नाही
शिक्षण माहित नाही
कार्यक्षेत्र अभिनेत्री
प्रमुख चित्रपट दम लगा के हैशा
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
नातेवाईक
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व / नागरिकत्व भारतीय

सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती, शिक्षण – Bhumi Pednekar Early Life, Education Information in Marathi

भूमी पेडणेकर यांचा जन्म १८ जुलै, १९८९ रोजी झाला होता. त्यांचे जन्मस्थान मुंबई, महाराष्ट्र असल्याचे सांगितले जाते.

भूमीच्या वडिलांचे नाव सतीश पेडणेकर असून ते महाराष्ट्र राज्याचे माजी गृह व कामगार मंत्री राहिले आहेत.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित

भूमीची आई सुमित्रा पेडणेकर एंटी-टोबॅको अ‍ॅक्टिव्हिस्ट म्हणून काम करतात. तोंडाच्या कर्करोगाने पतीच्या निधनानंतर त्यांनी हे कार्य गांभीर्याने घेतले.

भूमी पेडणेकर यांनी शालेय शिक्षण जुहूच्या आर्य विद्या मंदिरातून केले आहे. यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम पदवी मिळविली.

भूमी पेडणेकर अभिनय – Bhumi Pednekar Acting career, work

सहाय्यक संचालक म्हणून काम – Worked as an Assistant Director

जेव्हा त्या १५ वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना अभिनय शिकवण्यासाठी कर्ज घेतले.

विस्लिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये अभिनय शिकण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला. पण अकॅडमीमध्ये वारंवार गैरहजर असल्यामुळे त्यांना तेथून काढून टाकण्यात आले.

त्यानंतर त्यांनी यश राज फिल्म्समध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. आणि त्यांचे कर्ज फेडले. भूमी यांनी या पदावर शानू शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ६ वर्षे काम केले.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : गायत्री दातार यांची माहिती

भूमी पेडणेकर यांच्या काही चित्रपटाची नावे

चित्रपट वर्ष
दम लगा के हईशा 2014
Man’s World 2015
टॉयलेट: एक प्रेम कथा 2017
शुभ मंगल सावधान 2017
Lust Stories 2018
Sonchiriya 2019
सांड की आंख 2019
बाला 2019
पति पतनी और वो 2019
शुभ मंगल ज्यादा सावधान 2020
भूत – Part One: The Haunted Ship 2020
डॉली किट्टी और वो चमकते सितारे 2020
दुर्गावती 2020

पुरस्कार भूमी पेडणेकर – Bhumi Pednekar Awards and Recognitions

भूमी पेडणेकर यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खाली दिली आहे.

गौरवाचे वर्ष चित्रपट पुरस्कार
२०१६ दम लगा के हईशा फिल्मफेअर पुरस्कार
निर्माते गिल्ड फिल्म पुरस्कार
स्क्रीन पुरस्कार
झी सिने पुरस्कार
स्टारडस्ट पुरस्कार
बीआयजी स्टार मनोरंजन पुरस्कार
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार
२०१८ टॉयलेट: एक प्रेम कथा झी सिने पुरस्कार
२०१८ शुभ मंगल सावधान स्क्रीन पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार
२०१९ सांड की आंख फिल्मफेअर पुरस्कार

अधिकृत सोशल मीडिया खाते – Bhumi Pednekar Official Social media accounts

इंस्टाग्राम : https://www.instagram.com/bhumipednekar/ : 4.2m Followers (फेब्रुवारी २०२० पर्यंत)

फेसबुक : https://www.facebook.com/bhumipednekar/

ट्विटर : https://twitter.com/bhumipednekar/ : 582.7K Followers (फेब्रुवारी २०२० पर्यंत)


Read More info : Bhumi Pednekar Wiki info


अशा प्रकारे आज आपण भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

Mayank Agarwal information in marathi - मयंक अग्रवाल यांची माहिती

Mayank Agarwal information in marathi – मयंक अग्रवाल यांची माहिती

Nilu Phule Biography in marathi - निळू फुले यांची माहिती Nilu Phule information in Marathi

Nilu Phule Biography in marathi – खलनायक निळू फुले यांची माहिती