Biography of Akash Thosar in Marathi – आकाश ठोसर यांचे जीवनचरित्र
आकाश ठोसर हा एक भारतीय माजी कुस्तीपटू, चित्रपट अभिनेता आहे. जो बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीत दिसतो आणि मराठी चित्रपट सैराटमध्ये पारश्या या भूमिकेसाठी ओळखला जातो. नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या ‘सैराट’ या सिनेमामध्ये आकाशने परश्या (प्रशांत काळे)ची भूमिका साकारली होती.
Akash Thosar Short Biography in Marathi – आकाश ठोसर थोडक्यात माहिती
पूर्ण नाव | Akash Thosar – आकाश ठोसर |
जन्म | २४ फेब्रुवारी, १९९३ |
जन्मस्थान | पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्लिश, |
प्रसिद्ध चित्रपट | सैराट (सैराट मध्ये प्रशांत काळे उर्फ परश्या) |
अधिकृत फेसबुक खाते | फेसबुक |
पुरस्कार | जियो फिल्मफेअर अवॉर्ड्स |
वैयक्तिक जीवन – Akash Thosar Personal life
आकाश ठोसर एक तरुण मराठी अभिनेता आहे, ज्याने २००९ साली बॉलीवूडमधील मराठी चित्रपट सैराट मध्ये पारश्याची प्रमुख भूमिका साकारली. त्याची उंची सुमारे 5 फूट 7 इंच आहे. त्यांचे वजन सुमारे सुमारे ५८ किलोग्रॅम आहे.
त्यांचे शिक्षण पुण्यात एसएसवीएम येथे पूर्ण झाले, त्यानंतर पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले. कॉलेज स्तरावर त्यांनी काही नाटकांमध्ये भाग घेतला होता.
कौटुंबिक जीवन – Akash Thosar Family life
त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडिल आणि एक भाऊ आणि दोन बहिणी असा आहे. दोन्ही बहिणी विवाहित आहेत. त्यांचे वडील हे गवंडी काम करायचे आणि आई गृहिणी होत्या.
व्यावसायिक जीवन – Akash Thosar Career
आकाश जेंव्हा खेळामध्ये गर्क होता तेंव्हा सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भावाने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. नागराज मंजुळे यांना आकाशचा चेहरा आवडला आणि त्याला आपल्या चित्रपटात घेतले.
आणि तेथूनच त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी आकाश हा कुस्तीपटू होता. सैराट चित्रपटासाठी त्याने १३ किलो वजन कमी केले होते.
सैराट चित्रपट नंतर त्यांचे जीवन
सैराट चित्रपटाने त्यांचे पूर्ण जीवन बदलून गेले. सैराट चित्रपटात त्यांनी रिंकू राजगुरू या अभिनेत्री बरोबर एक चांगली भूमिका निभावली. त्यांचे परशा – आरची हे नाव खूप प्रचलित झाले.
चित्रपटा अगोदर ते कधीही मुंबई ला आले नव्हते. त्यांनी टीव्ही आणि युट्यूबवर १०० च्या वर मुलाखती दिल्या, चला हवा येऊ दया, कपिल शर्मा शो आणि अन्य कार्यक्रमांप्रमाणे लोकप्रिय शोमध्ये दिसू लागले.
FU (Friendship Unlimited) हा त्यांचा नवीन चित्रपट आहे. या चित्रपटासाठी ते लंडन ला पण गेले.
काही मराठी चित्रपटांची नावे – Akash Thosar films
चित्रपट | वर्ष | भाषा |
---|---|---|
सैराट | 2016 | मराठी |
FU: Friendship Unlimited | 2017 | मराठी |
Lust Stories | 2018 | हिंदी |
झुंड | 2019 | हिंदी |
पुरस्कार आणि मान्यता – Akash Thosar Awards and recognitions
आकाश थोसरने २०१७ मध्ये सर्वोत्कृष्ट सैराटमधील अभिनयासाठी तिसरा जियो फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी पुरस्कार (पुरुष) जिंकला.
More info : Wiki
तुम्हाला दिलेली आकाश ठोसर यांची माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद