Biography of Sharad Pawar in Marathi – शरद पवार यांचे जीवनचरित्र
शरद पवारसाहेब(Sharad Pawar) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ व १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून फुटून १९९९ साली स्थापलेल्या “राष्ट्रवादी काँग्रेस” पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
पवारसाहेब हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणचे आहेत. ते एका राजकीय कुटुंबाचे कुलपिता आहेत ज्यात त्यांची मुलगी तसेच त्यांचा पुतण्या आणि विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे.
२०१७ मध्ये, त्यांचे राजकीय विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले.
Biography of Sharad Pawar in Marathi – शरद पवार थोडक्यात माहिती
पूर्ण नाव | शरद गोविंदराव पवार |
जन्म | डिसेंबर १२, १९४० |
जन्मस्थान | बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र |
पत्नी | प्रतिभा पवार |
मुलीचे नाव | सुप्रिया सुळे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्लिश, |
पुरस्कार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार |
आरंभिक जीवन आणि कुटुंब – Sharad Pawar life
पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार. त्यांचे वडील हे सहकारी खारेरी विकी संघामध्ये काम करत होते. पवार साहेबांचे शिक्षण बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय कॉमर्स (बीएमसीसी), पुणे येथे झाले.
ते साधारण विध्यार्थी होते पण राजकारणात सक्रिय होते. त्यांचा विवाह प्रतिभा शिंदे यांच्या बरोबर झाला. त्यांच्या मुलीचे नाव सुप्रिया आहे. शरद पवार यांचे धाकटे भाऊ, प्रताप पवार, प्रभावी मराठी दैनिक “सकाळ” चालवतात.
राजकीय कारकीर्द – Sharad Pawar Political career
१९५६ साली जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांनी “गोवा मुक्ती सत्याग्रहाला” पाठिंबा देण्यासाठी एक विद्यार्थ्यांची रॅली आयोजित केली. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले. त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले.
वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
विधानसभा
सर्वप्रथम १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री.वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून वयाच्या २९व्या वर्षी समावेश झाला.
१९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले.
१८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्षयांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.
ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. या नंतर ते १९८८ ते १९९१ व १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातीचे मुख्यमंत्री होते.
राष्ट्रवादी पक्ष स्थापना
१० जून १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची‘ स्थापना केली. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.
त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले.
१ जुलै २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.
पुरस्कार आणि मान्यता – Sharad Pawar Awards and recognitions
पद्मविभूषण – २०१७ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या शिफारशीनुसार पवार यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने गौरविण्यात आले.
More info : Wiki
तुम्हाला दिलेली शरद पवार यांची माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद