Chatrapati Sambhaji Maharaj History in Marathi – छत्रपती संभाजीराजे भोसले यांची माहिती
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याच्या गादीवर आलेले हे दुसरे छत्रपती होते.
संभाजीराजांच्या आई, सईबाईं यांचे निधन, राजे लहान असताना झाले. त्यामुळे त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईं यांनी केले. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: रमाई आंबेडकर यांची माहिती
केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. केशवभटांनी त्यांना दंडनीती व प्रयोगरूपरामायण ऐकविले. शिवाय राजपुत्रास आवश्यक असे घोडयावर बसणे, शस्त्रविदया, तालीम, तिरंदाजी वगैरेंचे शिक्षण दिले.
Chatrapati Sambhaji Maharaj Biography in Marathi – छत्रपती संभाजीराजे भोसले यांची थोडक्यात माहिती
संपूर्ण नाव (Full Name) | छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले |
जन्म (Born) | १४ मे १६५७ |
जन्मस्थान | पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | ११ मार्च, १६८९ |
मृत्युस्थान | तुळापूर , महाराष्ट्र (समाधी: वढू, महाराष्ट्र) |
वडिलांचे नाव (Father) | छत्रपती शिवाजी महाराज |
आईचे नाव | सईबाई |
पत्नीचे नाव | येसूबाई |
अपत्ये: | शाहू महाराज, भवानीबाई |
राजधानी | रायगड |
छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जन्म, कौटुंबिक आणि प्रारंभिक जीवन – Chatrapati Sambhaji Maharaj Born, Mother, Father, Family
संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला. संभाजी राजे दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. लहानपणी त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजाबाईंनी केले.
राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : कसा कोंढाणा किल्ला जिंकला तानाजी मालुसरे यांनी?
मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.
राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान; राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती त्यांनी स्वतः लिहून घेतलेल्या तीन भागांतील बुधभूषण या गंथात आहे.
संभाजी राजे यांचा विवाह – The marriage of Sambhaji Raje
१६६५ मध्ये संभाजी राजे यांचा विवाह राजसबाई यांच्या बरोबर झाला, प्रत्येक मराठा रूढीनुसार त्यांचे नाव येसूबाई असे ठेवण्यात आले. येसूबाई ह्या पिलाजीराजे शिर्के यांची कन्या होती,
संभाजीराजांना कन्या भवानीबाई आणि पुत्र छत्रपती शाहू अशी दोन अपत्ये झाली.
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक – Sambhaji Raje Rajyabhishek
१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला.
संभाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारी – Sambhaji Maharaj and Palakhi of Sant Tukaram Maharaj – Ashadhi Wari
महाराणी येसूबाई यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले होते, “श्री शाहु महाराज”. त्यामुळे त्यांना आशिर्वाद देण्यासाठी महादेव महाराज आले होते.
महादेव महाराज हे संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज यांचे सुपुत्र.
भेटीमागचे आणखी एक असे कारण होते, ते म्हणजे देहु ते पंढरपुर अशी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरु करावी.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती
परंतु जागोजागी असलेले औरंगजेबाचे मुघल सैन्य या महान कार्यासाठी अडथळा ठरू पाहत होते.
छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समोर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपली व्यथा पण सांगितली. शंभू राजांनी तात्काळ या आषाढी वारी ला आपली संमती दर्शवली.
स्वराज्याचे मावळे या पालखीस संरक्षण देतील अशी हमी देखील दिली. इतकेच नव्हे तर पंढरपूर वारी च्या या पालखीस आर्थिक मदत देखील देऊ केली.
संभाजी महाराजांनी तात्काळ याचा आदेश जागोजागी आपल्या सरदार आणि मावळ्यांना पाठवला. या मुळे वारकरी आणि धारकरी यांचे नाते अधिकच घट्ट झाले.
संभाजी महाराजांनी बांधलेले अरमार द नेव्ही – Armaar The Navy Built by Sambhaji Maharaj
ज्यांचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल, हे शिवाजी महाराजांचे विचार होते.
आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली. जहाज बांधणीचे काम सुरु केले.
पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला. या आरमाराची जवाबदारी दर्या सारंग, दौलत खान आणि मायनाक भंडारी या सारख्या पराक्रमी, अनुभवी आणि मातब्बर सरदारांकडे होती
बुरहानपुर वर हल्ला – Attack on Burhanpur
बुरहानपूरचा किल्ला प्रथम बहादूर खानच्या ताब्यात होता आणि नंतर त्याने काकर खानला दिला.
नागरिकांकडून जिझिया कर वसूल करण्याचे काम त्याच्याकडे होते.
हे काम साध्य करण्यासाठी, काकर खानने बुरहानपूरच्या आसपासची १०० पेक्षा जास्त मंदिरे नष्ट केली आणि संपत्तीसाठी लोकांची लूटमार केली.
बुरहानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती.
संभाजी राजे यांनी १६८१ साली बुरहानपूर वर हल्ला केला. रायगड ते बुरहानपूर हे १००० किमी पेक्षा जास्त अंतर आहे. परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज त्या ठिकाणी पोहोचले .
संभाजी महाराज स्वतः या मोहिमेत सहभागी होते. या मोहिमेत शत्रूची जीवितहानी कमीत कमी होईल याची दक्षता शंभु राजांनी घेतली.
या मोहिमेत हिरे मोती सोने नाणे अशी १ करोड हुन जास्त होनांची दौलत स्वराज्यात आणली .
तुम्हाला दिलेली छत्रपती संभाजीराजे भोसले (Chatrapati Sambhaji Maharaj History in Marathi) यांची माहिती आवडली असेल.
हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद
Click here to read more information. : Chatrapati Sambhaji Maharaj Wiki | छत्रपती संभाजीराजे भोसले