Sachin Tendulkar Biography in Marathi – सचिन तेंडुलकर यांचे जीवनचरित्र(Biography, Life, Age, Education, Family, House, Awards)
सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेटच्या इतिहासात जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “भारत रत्न” सचिन यांना देण्यात आला. हा पुरस्कार मिळणारे ते प्रथम खेळाडू आहेत आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे.
राजीव गांधी पुरस्काराने पण सन्मानित केले आहे. 2008 मध्ये त्यांना पद्म विभूषण सुद्धा मिळाले आहे. 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी फलंदाजीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावले आहेत.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: अंडर- १९ यशस्वी जयस्वाल यांची माहिती
ते कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाज आहेत. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये 14000 पेक्षा जास्त धावा काढण्यासाठी तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावाही काढल्या.
सचिन हा एक चांगला माणूस आहे. सचिन ज्याला क्रिकेटचा मास्टर असे म्हटले जाते, त्यांनी देश विदेश ला भारताचे नाव गाजवले आहे.
Sachin Tendulkar Biography in Marathi – सचिन तेंडुलकर यांचे जीवनचरित्र
अंक (Points) | माहिती (Information) |
---|---|
पूर्ण नाव (Full Name) | सचिन रमेश तेंडुलकर |
टोपण नाव | लिटिल, तेंडल्या, क्रिकेट के भगवान, मास्टर ब्लास्टर, द मास्टर, द लिटिल चॅम्पियन |
जन्म (Born) | २४ एप्रिल, १९७३ |
जन्मस्थान(Birthplace) | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय(Age) | २०२० पर्यंत वय वर्ष ४६ |
वडिलांचे नाव | रमेश तेंडुलकर |
पत्नीचे नाव (Wife Name) | डॉ. अंजलि महेता |
मुलाचे नाव | अर्जुन तेंडुलकर |
मुलीचे नाव | सारा तेंडुलकर |
विशेषता | फलंदाज |
फलंदाजीची पद्धत | उजखोरा |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने लेग ब्रेक/ऑफ ब्रेक/मध्यमगती |
राष्ट्रीयत्व / नागरिकत्व | भारतीय |
सुरुवातीचे जीवन – Sachin Tendulkar life
२४ एप्रिल, १९७३ रोजी राजापूर येथील मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांनी त्यांचे आवडते संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या वरुण सचिन हे नाव देण्यात आले.
त्याचे मोठे बंधू अजित तेंडुलकरने सचिन यांना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. 1995 मध्ये सचिन तेंडुलकरची अंजली तेंडुलकरशी विवाह झाला होता. सारा आणि अर्जुन असे सचिनचे दोन मुले आहेत.
सचिनने शारदाश्रम विद्यामंदिर येथे शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षक रामचंद्र आचरेकर यांच्या सानिध्यात राहून घेतले. वेगवान गोलंदाज होण्यासाठी सराव कार्यक्रमात भाग घेतला पण वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक डेनिस लिली यांनी आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
सामान्य कुटुंबात वाढणारा, सचिनने शारदाश्रम विद्यापीठात मुंबई येथे शिक्षण घेतले. त्याचे भाऊ अजित तेंडुलकर बालपणमध्ये सचिनची क्रिकेटमधील रुची पाहून क्रिकेट खेळायला मान्यता दिली आणि त्याला योग्य मार्गदर्शन केले.
क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर यांनी त्यांना एक सक्षम शिक्षण दिले. हँरिस शिल्ड सामन्यात विनोद कांबळे सोबत वैयक्तिक 326 धावांनी 664 धावांच्या विक्रमी भागीदारीची नोंद केली आणि 15 व्या वर्षी मुंबई संघात तो सामील झाला.
सचिनचे प्रशिक्षक रमेश आचरेकर सचिन यांना प्रशिक्षित करण्याचा मार्ग पूर्णपणे अनोखा होता. तो क्रीजवर विकेट खाली १ रुपयांचा नाणे ठेवत असे. जर सचिन आऊट नाही झाला तर ते नाणे त्याला भेटत असे.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: अंडर- १९ अथर्व अंकोलेकर यांची माहिती
अशा प्रकारे सचिनने आतापर्यंत आपल्या मास्टरकडून १३ नाणी जिंकल्या आहेत. ती नाणी सचिन कडे आज पर्यंत आहेत. अशाप्रकारे सचिन च्या गुरूने त्यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला फलंदाजीचा मास्टर बनवला.
सचिन यांनी १९९० मध्ये इंग्लंडमध्ये आपला पहिला कसोटी शतक झळकावला होता.
त्यामध्ये त्याने नाबाद राहून ११९ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात सचिनने अनेक शतके झळकवले होते.
1992-93 मध्ये सचिनने भारताविरुद्ध इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळला होता. सचिन ची कामगिरी पाहून त्यांना डॉन ब्रॅडमन ची उपाधी देण्यात आली.
सचिन हा एक साधा माणूस आहे. तो खूप प्रसिद्ध झाला तरीही तो सर्वांशी नम्र असतो. तो त्याच्या चांगल्या वागणुकीबद्दल आपल्या वडिलांना श्रेय देतो. तो म्हणतो, “मी जे काही आहे ते, मी माझ्या वडिलांमुळे आहे.
त्यांनी मला साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे गुण दिले. ते मराठी साहित्याचे एक शिक्षक होते आणि नेहमी हे समजावून सांगत होते की जीवन अतिशय गंभीरपणे जगले पाहिजे.
जेव्हा त्यांना हे कळले की शिक्षणा पेक्षा क्रिकेट हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग होणार आहे,
त्याबद्दल त्यांना वाईट वाटले नाही. त्यांनी मला प्रामाणिकपणे खेळण्यासाठी आणि आपले स्तर चांगले ठेवण्यासाठी सांगितले. कष्टाची भीती बाळगू नका.”
पाकिस्तानविरुद्धची कामगिरी
भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नेहमीच दडपण असते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्, खेळाडू आपल्या खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करतात असे समजले जाते.
तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी १६ कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यांमध्ये त्याने ३९.९१ च्या सरासरीने ९१८ धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (५५.३९) ही सरासरी कमी आहे.
पाकिस्तानविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १९४; ही सुद्धा त्याच्या एकंदरीत सर्वोच्च धावसंख्येपेक्षा (२४८) कमी आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी त्यामानाने चांगली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.५८ च्या सरासरीने २१२२ धावा केल्या आहेत. त्याच्या एकंदरीत एकदिवसीय सामन्यांची सरासरी ४४.२० आहे.
जागतिक विक्रम:
१ बांगलादेश विरुद्ध मिरपूरमध्ये शतक
२ कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा सर्वोच्च स्कोर.
३ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुहेरी शतक झळकावणारा पहिला खेळाडू बनला.
४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 49 शतके पटकावणारे.
५ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे (18000 पेक्षा अधिक धावा).
६ विश्वचषक स्पर्धेतील एकदिवसीय सामन्यामधील उच्चतम स्कोअर.
७ सचिन तेंडुलकर सर्वाधिक कसोटीत शतक (51) शतक
८ कसोटी क्रिकेटमध्ये 13000 धावा मिळविणारा जगातील पहिला फलंदाज सचिन तेंडुलकर.
९ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक मालिकावीर.
१० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त सामनावीर पुरुष
११ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त 30,000 धावा करण्याचा रेकॉर्ड.
पुरस्कार आणि मान्यता – Sachin Tendulkar Awards and Recognitions
- १९९४ – क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार
- १९९७-९८ – राजीव गांधी खेल रत्न, भारताच्या खेळाच्या कामगिरीचा सर्वोच्च सन्मान
- १९९९ – पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- २००१ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- २००८ – पद्म विभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- २०१४ – भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
कारकिर्दी माहिती (१५ जून, २०१३ पर्यंत नोंदी)
# | कसोटी | एकदिवसीय क्रिकेट | प्रथम श्रेणी | लि.अ. |
---|---|---|---|---|
सामने | 200 | 463 | 307 | 551 |
धावा | 15921 | 18426 | 25228 | 21999 |
फलंदाजीची सरासरी | 53.79 | 44.83 | 57.86 | 45.54 |
शतके/अर्धशतके | ५१/६८ | ४९/९६ | ८१/११४ | ६०/११४ |
सर्वोच्च धावसंख्या | २४८* | २००* | २४८* | २००* |
चेंडू | 4210 | 8054 | 7563 | 10230 |
बळी | 45 | 154 | 70 | 201 |
गोलंदाजीची सरासरी | 54.68 | 44.48 | 62.18 | 42.17 |
एका डावात ५ बळी | 0 | 2 | 0 | 2 |
एका सामन्यात १० बळी | 0 | n/a | 0 | n/a |
सर्वोत्तम गोलंदाजी | 44107 | 11810 | 44107 | 11810 |
झेल/यष्टीचीत | ११५/– | १४०/– | १८६/– | १७५/– |
सचिन तेंडुलकर यांचे अधिकृत सोशल मीडिया खाते – Sachin Tendulkar Official Social media accounts
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sachintendulkar/
फेसबुक : https://www.facebook.com/SachinTendulkar/
ट्विटर : https://twitter.com/sachin_rt/
Read More info : Dr Sachin Tendulkar Wiki info
अशा प्रकारे आज आपण सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद🙏🙏🙏