Devdatta Nage information in Marathi, Biography, Age, Family – देवदत्त नागे यांची माहिती
देवदत्त नागे यांना आपण सर्व जण ओळखतो, ते एक मराठी चित्रपटातील अभिनेता आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिकेत आणि चित्रपटात अभिनय केला आहे.
झी मराठीच्या लोकप्रिय मालिका “जय मल्हार” साठी देवदत्त सर्वांना परिचित आहेत ज्यात त्यांनी सुरभी हांडे आणि ईशा केसकर यांच्यासमवेत भगवान खंडोबाची भूमिका केली होती.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांची सविस्तर माहिती
आज आपण देवदत्त नागे यांची माहिती जाणून घेऊया. हि माहिती तुमच्या मित्र परिवारामध्ये पुढे शेयर करा.
Devdatta Nage information in Marathi – देवदत्त नागे यांची थोडक्यात माहिती
पूर्ण नाव (Name) | देवदत्त नागे |
अन्य नाव | देव |
जन्म (Born) | ६ फेब्रुवारी १९८१ |
जन्मस्थान (BirthPlace) | अलिबाग, महाराष्ट्र, भारत |
वडिलांचे नाव | – |
आईचे नाव | – |
पत्नीचे नाव | कांचन नागे |
अपत्ये | निहार नागे |
शिक्षण | बीएससी केमिस्ट्री, बॅचलर ऑफ लॉ (LLB) |
देवदत्त नागे यांचे वैयक्तिक जीवन / कुटुंब – Devdatta Nage family
देवदत्त नागे हे एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता आहेत. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८० रोजी महाराष्ट्रातील अलिबाग येथे झाला.
ते मूळचे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग गावचे आहेत. त्यांनी बीएससी केमिस्ट्रीमध्ये पदवी पूर्ण केली आणि १० वर्षे पॅरामेडिकलमध्ये काम केले.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: नाना पाटेकर यांची माहिती
त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि मालिका मध्ये अभिनय करताना दिसतात.
अभिनय बरोबर ते मॉडेलिंग सुद्धा करतात. त्यांनी अनेक फॅशन शो केली असून मुंबई विद्यापिटाचे विजेता देखील आहेत. ते नियमित पाने जिमला जातात आणि आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतात.
कांचन नागे असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. त्या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांना निहार नागे नावाचा एक मुलगा आहे.
Devdatta Nage other info – देवदत्त नागे यांची थोडक्यात माहिती
कार्यक्षेत्र | अभिनय, |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | वीर शिवाजी, लागी तुझसे लगन, देवयानी, जय मल्हार, |
प्रमुख चित्रपट | तान्हाजी: द अनसंग वॉरियर |
भाषा | मराठी, हिंदी, |
प्रमुख नाटक | एक माऊ चार भाऊ |
धर्म | – |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कारकीर्द – Devdatta Nage film industry career
देवदत्त नागे यांनी २०११ मध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. २०११ मध्ये कलर्स टीव्हीवरील मालिका “वीर शिवाजी” यासह त्यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली. कलर्स टीव्हीच्या “लागी तुझसे लगन” या मालिकेतही ते दिसले.
झी मराठीची लोकप्रिय मालिका “जय मल्हार” मधील भूमिका साकारणारे देवदत्त नागे सर्वांनाच ठाऊक आहेत ज्यात त्यांनी सुरभी हांडे आणि ईशा केसकर यांच्यासमवेत खंडोबा देवाची भूमिका साकारली होती.
तसेच त्यांना स्टार प्रवाहच्या “देवयानी” या लोकप्रिय मालिकेत पाहिले आहे ज्यात त्यांनी भैयाराव विखे पाटील यांची भूमिका साकारली होती.
मृत्युंजय कर्नाची अमरगाथा, काले तस्मय नमः, बाजीराव मस्तानी अशा अन्य मराठी मालिकांमध्येही त्यांनी उत्कृष्ट असा अभिनय केला आहे. “एक माऊ चार भाऊ” हे त्यांचे व्यावसायिक नाटक आहे.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: गायत्री दातार यांची माहिती
२०१४ मध्ये “संघर्ष” या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०१३ मध्ये “वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दुबारा” आणि २०१८ मध्ये “सत्यमेव जयते” या सिनेमातून त्यांचे बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.
२०२० मध्ये त्यांनी “तन्हाजी: द अनसंग वॉरियर” या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी अभिनय केला ज्यामध्ये अजय देवगन, अजिंक्य देव, सैफ अली खान यांच्यासमवेत त्यांनी सूर्याजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती.
बॉलिवूडचा हा देवदत्त यांचा तिसरा चित्रपट आहे. “तन्हाजी: द अनसंग वॉरियर” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा आकडा पार करणारा २०२० चा पहिला हिट चित्रपट ठरला.
मराठी आणि हिंदी मालिका – Devdatta Nage Marathi and Hindi Serial (स्त्रोत)
- [सूर्यजी] तानाजी मालुसरे म्हणून
- लागी तुझसे लगन
- देवयानी भैय्या विखेपाटील म्हणून
- जय मल्हार मध्ये खंडोबा देवाची भूमिका
मराठी आणि हिंदी चित्रपट -Devdatta Nage Marathi & Hindi Movies
- संघर्ष
- वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा! 2013
- सत्यमेव जयते
- तान्हाजी: द अनसंग वॉरियर
अधिकृत सोशल मीडिया खाते – Devdatta Nage Official Social media accounts
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/devdatta.g.nage/
फेसबुक : https://www.facebook.com/golddev/
ट्विटर : माहिती उपलब्ध नाही
तुम्हाला दिलेली देवदत्त नागे(Devdatta Nage Biography, Age, Family, information in Marathi) यांची माहिती आवडली असेल.
हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद