in

Irrfan Khan biography in marathi – इरफान खान यांची माहिती

Irrfan Khan biography in marathi - इरफान खान यांची माहिती
Irrfan Khan biography in marathi - इरफान खान यांची माहिती

Irrfan Khan biography in marathi – इरफान खान यांची माहिती (Wiki, Age, Caste, Birth Date, Wife, Education, Family, Serial, Movies and More)

साहबजादे इरफान अली खान हे एक भारतीय अभिनेता होते, ज्यांनी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटसृष्टीत देखील अभिनय केला आहे.

खान यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक आशियाई फिल्म पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह सन्मानित करण्यात आले.

२०११ मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज आपण इरफान खान यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म (Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब (Family)? त्यांचे शिक्षण (Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.

इरफान खान यांचे जीवनचरित्र – Irrfan Khan information in Marathi

अंक (Points) माहिती (Information)
पूर्ण नाव (Name) साहबजादे इरफान अली खान
अन्य नाव
जन्म (Born) ७ जानेवारी, १९६७
जन्मस्थान (Birthplace) जयपूर, राजस्थान, भारत
मृत्यू (Death) २९ एप्रिल २०२०,
मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय (Age) वय ५३ वर्ष
निवासस्थान
वडिलांचे नाव यासीन अली खान
आईचे नाव सईदा बेगम खान
भाऊ-बहीण
वैवाहिक स्थिती विवाहित
पत्नीचे नाव (Wife Name) सुतपा सिकदर
मुले (Irrfan Khan Daughter / Son) बाबिल आणि अयान
शिक्षण
कार्यक्षेत्र अभिनेता
प्रमुख चित्रपट नेमसेक,
पान सिंग तोमर,
मकबूल,
सलाम बॉंबे
प्रमुख टीव्ही कार्यक्रम डर (स्टारप्लस), चाणक्य, चंद्रकांता, भारत एक खोज
भाषा हिंदी, इंग्लिश
राष्ट्रीयत्व भारतीय

इरफान खान यांचे सुरुवातीचे आणि वैयक्तिक जीवन – Early and Personal life of Irrfan Khan

इरफान खान यांचा जन्म राजस्थानात पठाण वंशाच्या मुस्लिम कुटुंबात झाला.

खान यांची आई सईदा बेगम खान आणि वडील यासीन अली खान राजस्थानच्या टोंक जिल्ह्याजवळील खजुरिया गावातले होते व टायरचा व्यवसाय करीत होते.

इरफान यांना क्रिकेटची आवड होती आणि त्यांना अंडर -२३ खेळाडूंसाठी सीके नायडू ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी निवडण्यात आले; ही स्पर्धा भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी एक महत्त्वपूर्ण पायरी होती. परंतु, पैशा अभावी ते खेळू शकले नाहीत.

१९८४ मध्ये अभिनयाचा अभ्यास करण्यासाठी नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये जाण्यापूर्वी खान यांनी जयपूरमध्ये एमए ची पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले.

फेब्रुवारी १९९५ मध्ये खान यांनी लेखक आणि सहकारी एनएसडी पदवीधर सुतपा सिकदर यांच्याशी लग्न केले. बाबिल आणि अयान असे त्यांना दोन मुले आहेत.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित

इरफान खान चित्रपट कारकीर्द – film career of Irrfan Khan

१९८७ मध्ये एनएसडीमधून पदवी घेतल्यानंतर मीरा नायरच्या सलाम बॉम्बेमध्ये खान यांना किरकोळ भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

१९९० च्या काळात त्यांनी चाणक्य, भारत एक खोज, सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांत, श्रीकांत, दूरदर्शनवरील अनुगूंज, स्टार बेस्टसेलर्स (स्टार प्लस), आणि स्पर्श अशा असंख्य दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले.

१९९८ मध्ये खान यांनी संजय खानची मालिका “जय हनुमान” मध्ये “रत्नकर” डाकूची भूमिका साकारली होती.

२००३ ते २००४ या काळात त्यांनी अश्विन कुमार यांच्या ‘रोड टू लडाख’ या शार्ट फिल्म मधे काम केले.

२००४ मध्ये हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार जिंकला.

२००७ मध्ये, बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या मेट्रो चित्रपटासाठी खान यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि द नेमसेक हा पुरस्कार मिळाला.

२००८ साली ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटात खानने पोलिस निरीक्षकाची भूमिका केली होती, त्यांना पिक्चर मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी स्क्रीन एक्टर्स गिल्ड अवॉर्ड मिळाला होता.

२००९ मध्ये त्यांनी अ‍ॅसिड फॅक्टरी चित्रपटात भूमिका केली. वास्तविक जीवनातील अ‍ॅथलीटबद्दल “पानसिंग तोमर” या चित्रपटात त्यांनी डाकूंची भूमिका साकारली होती आणि त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला.

खान यांनी इंग्लिश चित्रपटात देखील अभिनय केला आहे, २०१२ मध्ये अ‍ॅमेझिंग स्पायडर मॅनमध्ये डॉ. रजितची भूमिका केली होती.

खान यांचा शेवटचा चित्रपट अंग्रेज़ी मीडियम यामध्ये मुलीच्या वडिलांच्या मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाला होता.

इरफान खान यांच्या चित्रपटांची यादी – List of Movies by Irrfan Khan

त्यांनी अनके हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. त्यापैकी काही चित्रपटांची नावे खाली दिली आहेत.

अंग्रेज़ी मीडियम, कारवां, ब्लैकमेल, करीब करीब सिंगल, हिंदी मीडियम, डी-डे, द लंच बॉक्स, ये साली ज़िन्दगी, सात खून माफ़, थैंक यू, राईट या राँग, हिस्स, नोक आउट, एसिड फैक्ट्री, बिल्लू बारबर, न्यूयॉर्क, भोपाल मूवी, स्लमडॉग मिलियनेयर, माइग्रेशन, द नेमसेक, द किलर, यूँ होता तो क्या होता, आन, चरस, मकबूल, हासिल, द बाइपास, धुंध, फुटपाथ, सुपारी, काली सलवार, गुनाह, बोकशू द मिथ, प्रथा, द वॉरियर, कसूर, घात इत्यादी.

इरफान खान यांनी मिळालेले पुरस्कार – Awards by Irrfan Khan

१. २०११ मध्ये पद्मश्री पुरस्कार
२. २००३ मध्ये हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार
३. २००७ मध्ये लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता पुरस्कार
४. २०१२ मध्ये पानसिंग तोमर चित्रपटाकरिता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता

अधिकृत सोशल मीडिया खाते – Irrfan Khan Official Social media accounts

इंस्टाग्राम (Irrfan Khan instagram) : https://www.instagram.com/irrfan/

फेसबुक (Irrfan Khan facebook) :

ट्विटर (Irrfan Khan twitter): https://twitter.com/irrfank/

भारतीय सिनेमासृष्टीने एक मोलाचा हिरा गमावला – निधन

इरफान यांना २८ एप्रिल २०२० ला संध्याकाळी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते.

२९ एप्रिल ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या निधनाने भारतीय सिनेमासृष्टीने एक मोलाचा हिरा गमावला अशी हळहळ बॉलीवूड मधल्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी व्यक्त केली.

भारत सरकार आणि राजकीय नेते यांनी दु:ख व्यक्त केले.

अशा प्रकारे आज आपण इरफान खान(Irrfan Khan Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा, धन्यवाद MarathiBiography.com

Irrfan Khan Wiki info

अश्विनी कासार यांची माहिती Ashwini Kasar information in Marathi

अश्विनी कासार यांची माहिती | Ashwini Kasar information in Marathi

Rishi Kapoor biography in marathi - ऋषी कपूर यांची माहिती

Rishi Kapoor biography in marathi – ऋषी कपूर यांची माहिती