Jayshree Gadkar Biography, Son, Age, Movie, Husband in Marathi – जयश्री गडकर यांची माहिती मराठीत
जयश्री गडकर एक लोकप्रिय मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होत्या. त्या १९५० ते १९८० दशकापर्यंत मराठी चित्रपटसृष्टी च्या एक स्टार होत्या.
आज आपण जयश्री गडकर यांची माहिती जाणून घेऊया.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : भारताच्या स्वातंत्र्य साठी लढणारे महात्मा गांधी यांचे जीवन
जयश्री गडकर यांचे जीवनचरित्र – Jayshree Gadkar Short Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | जयश्री गडकर |
जन्म(Born) | २१ मार्च, १९४२ |
जन्मस्थान(Birthplace) | कणसगिरी, कारवार जिल्हा, कर्नाटक, भारत |
मृत्यू (Death) | २९ ऑगस्ट २००८ |
मृत्यूस्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
मूळ गाव | कणसगिरी |
वडिलांचे नाव | – |
आईचे नाव | – |
भाऊ-बहीण | – |
पतीचे नाव(Husband Name) | बाळ धुरी |
अपत्ये | अविनाश आणि विश्वजीत धुरी |
सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Jayshree Gadkar Personal Life Information
जयश्री यांचा जन्म २१ मार्च, १९४२ मध्ये भारताच्या कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवारजवळील कनसगिरी येथे कोकणी भाषिक कुटुंबात झाला होता.
आई वडील यांचे नाव आणि इतर माहिती आम्हाला मिळाली नाही. जर ही माहिती तुमच्या जवळ असल्यास जरूर आम्हाला कळवा.
रामानंद सागर यांची जुनी टीव्ही मालिका रामायण यामध्ये कौशल्याची भूमिका जयश्री यांनी साकारली आहे. त्यामध्ये दशरथ राजाची भूमिका करणारे सुप्रसिद्ध असलेले अभिनेते बाळ धुरी यांच्याशी जयश्री यांचे लग्न झाले.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : डान्सर मानसी नाईक यांची माहिती
जयश्री यांचे चित्रपटातील भूमिका, त्यांचे यशस्वी चित्रपट, त्यांचे कारक्षेत्र – Jayashree’s role in the film, his successful film, his fieldwork
कार्यक्षेत्र | मराठी नाटक, मराठी चित्रपट, बॉलीवूड, मराठी दूरचित्रवाणी मालिका, हिंदी दूरचित्रवाणी मालिका, |
प्रमुख चित्रपट | साधी माणसं, सवाल माझा ऐका, |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | महाभारत |
भाषा | कोंकणी, मराठी, हिंदी, |
पुरस्कार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार |
धर्म | हिंदू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कारकीर्द – Jayshree Gadkar Career
गडकर यांनी बाल नृत्य कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. चित्रपटांमध्ये तमाशा डान्सर म्हणून प्रवेश केला.
त्यांची पहिली भूमिका १९५५ मध्ये व्ही. शांताराम यांच्या जनक पायल बाजे मधील एका गटातील नर्तकीची होती, त्यामध्ये प्रमुख स्त्री जयश्री होत्या.
नंतर, मराठी चित्रपट दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी राजा गोसावी यांच्या समवेत, दिसतं तसं नसतं या मराठी चित्रपटात नृत्यासह एका छोट्या भूमिकेत त्यांना कास्ट केले.
त्यानंतर तमशावर आधारित सांगत्ये ऐका हा पहिला चित्रपट होता ज्यात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
त्या चित्रपटापासून त्यांची लोकप्रियता वाढली आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत हिरोईन बनल्या.
जयश्री यांच्या कारकिर्दीत २५० पेक्षा ज्यास्त चित्रपटात काम केले. त्यामध्ये तमाशा, प्रेम, श्रीमंत, गरीब कथांचा समावेश होता.
गडकर यांचे काही मराठी चित्रपट – Jayshree Gadkar Marathi movie list
चित्रपट | वर्ष |
---|---|
अशी असावी सासू | मराठी |
एक गाव बारा भानगडी | मराठी |
दिसतं तसं नसतं | मराठी |
मोहित्यांची मंजुळा | मराठी |
वैजयंता | मराठी |
वैशाखवणवा | मराठी |
सवाल माझा ऐका | मराठी |
सांगत्ये ऐका | मराठी |
अवघाचि संसार | मराठी |
बाप माझा ब्रह्मचारी | मराठी |
मोहित्यांची मंजुळा | मराठी |
साधी माणसं | मराठी |
कडकलक्ष्मी | मराठी |
मल्हारी मार्तंड | मराठी |
एक गाव बारा भानगडी | मराठी |
आई कुना म्हणू मी | मराठी |
पाटलाची सून | मराठी |
सून लाडकी या घरची | मराठी |
जिव्हाळा | मराठी |
साधी मानस | मराठी |
पुरस्कार – Jayshree Gadkar Awards and Recognitions
जयश्री गडकर यांना मानिनी, वैंजयंता, सवाल माझा ऐका व साधी माणसं या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
अशा प्रकारे आज आपण जयश्री गडकर(Jayshree Gadkar Biography, Son, Age, Movie, Husband in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏
More info : Wiki