in ,

कल्पना चावला यांची माहिती मराठी- Kalpana Chawla information Marathi

कल्पना चावला माहिती मराठी- Kalpana Chawla information Marathi
NASA [Public domain]

प्रत्येक भारतीयांच्या मनातील अंतराळ परी कल्पना चावला यांची माहिती मराठी- Kalpana Chawla information Marathi

कल्पना चावला पहिली भारतीय अमेरिकन अंतराळवीर आणि अंतराळात गेलेली पहिली भारतीय महिला होती. १९९७ मध्ये, ती एक अंतरिक्ष शटल मिशन तज्ञ होती

त्यांनी पहिले मिशन तज्ञ आणि रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून १९९७ मध्ये स्पेस शटल कोलंबियावर उड्डाण केले. २००३ मध्ये झालेल्या अंतराळ यान स्पेस शटल कोलंबिया अपघातात निधन झालेल्या सात क्रू सदस्यांपैकी चावला एक होती.

चावला यांना मरणोत्तर नंतर Congressional Space Medal देऊन सन्मानित करण्यात आले.

काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.

कल्पना चावला यांचा सुंदर असा सुविचार

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.

कल्पना चावला यांचे जीवनचरित्र – Kalpana Chawla Short Biography in Marathi

पूर्ण नाव (Name) कल्पना चावला
जन्म (Born) १७ मार्च १९६२
जन्मस्थान (Birthplace) करनाल, हरियाणा, भारत
मृत्यु (Death) १ फेब्रुवारी २००३
मूळ_गाव करनाल
वडिलांचे नाव (Father) बनारसीलाल चावला
आईचे नाव (Mother) संयोगीता चावला
पतीचे नाव जीन पियरे टॅरिसन
अपत्ये
व्यवसाय (Occupation) इंजीनियर, टेक्नोलॉजिस्ट
भाषा हिंदी, इंग्लिश
पुरस्कार (Award) कांग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर
राष्ट्रीयत्व संयुक्त राज्य अमरीका भारत

सुरुवातीचे जीवन – Kalpana Chawla Life

कल्पना चावला यांचा जन्म हरियाणा, करनाल येथे झाला. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव श्री बनारसी लाल चावला आणि आईचे नाव संयोगीता चावला. त्या कुटुंबातील चार भाऊ व बहिणींपैकी सर्वात धाकटी होती. घरातले प्रत्येकजण प्रेमाने त्यांना मोन्टू म्हणत.

कल्पना चावला भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना घरकाम, नटणे यापेक्षा मित्र मैत्रिणींबरोबर सायकल वरुन ट्रिप ला जाने खुप आवडत असे. त्यांना बाहेरगावी फिरण्यास खूप आवडत होते.

चावला यांचे सुरुवतीचे शिक्षण “टागोर बाल निकेतन” मध्ये झाले. कल्पना जेव्हा आठवीत शिकत होती, तेव्हा त्यांनी इंजिनियर बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यांच्या आईने आपल्या मुलीच्या भावना समजून घेत पुढे जाण्यास मदत केली. वडिलांना तिला डॉक्टर किंवा शिक्षक बनवायचे होते. पण कल्पना लहानपणापासूनच अंतराळात फिरण्याचे स्वप्न रंगवीत असे.

त्यांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे उत्कटता आणि लढाऊ स्वभाव. त्यांनी कधीही कामात आळस दाखवला नाही आणि कधी अयशस्वी झाल्याने चिंताग्रस्त झाली नाही.

कल्पना चावला यांचे शिक्षण – Kalpana Chawla Education

कल्पना चावला यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण करनालच्या टागोर पब्लिक स्कूलमधून केले.

पुढील शिक्षण त्यांनी पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय, चंदीगड, येथून एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये घेतले. १९८२ मध्ये त्यांनी तेथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली.

त्यानंतर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या १९८२ मध्ये अमेरिकेत गेल्या, त्यांनी आर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली.

कल्पना जी यांना विमान, ग्लायडर्स आणि व्यावसायिक विमान परवान्यांचे प्रमाणित उड्डाण प्रशिक्षक होते.

त्यांना एकल आणि मल्टी इंजिन विमानासाठी व्यावसायिक ऑपरेटर म्हणून देखील परवाना मिळाला होता. कल्पना जी अंतराळवीर होण्यापूर्वी नासा या ठिकाणी एक प्रसिद्ध वैज्ञानिक होत्या.

चावला यांचे वैयक्तिक जीवन – Kalpana Chawla’s Personal Life

कल्पना जी जेव्हा उच्च घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या, तेव्हा त्यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता.

कल्पना जी त्यांच्याकडून विमान चालवण्याचे शिक्षण घेत होत्या. त्या वेळेस त्यांचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले.

जेपी आणि कल्पना चावला यांच्या मैत्रीचे नाते प्रेमात बदलले आणि १९८४ साली त्यांचा विवाह झाला.

पुढील पानावर पूर्ण माहिती पहा.

उद्योगपती एन.आर. नारायणमूर्ती यांचे जीवनचरित्र - N R Narayana Murthy Biography in Marathi

उद्योगपती एन.आर. नारायणमूर्ती यांचे जीवनचरित्र – N R Narayana Murthy Biography in Marathi

सौरभ गांगुली यांचे जीवनचरित्र - Sourav Ganguly Information in Marathi

सौरभ गांगुली यांचे जीवनचरित्र – Sourav Ganguly Information in Marathi