in , ,

लोकमान्य टिळक यांची माहिती – Lokmanya Tilak information in Marathi

बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा

८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले.

काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही.

शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.

सात विरुद्ध दोन मतांनी ज्यूरींनी त्यांना दोषी ठरविले व कोर्टाने सहा वर्षे काळे पाणी व १,००० रु. दंडाची शिक्षा फर्मावली.

काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

सहा वर्षांच्या कारावासानंतर १५ जून १९१४ रोजी सरकारने त्यांना मुक्त केले.

वृत्तपत्रकार

चिपळूणकर, टिळक, आगरकर, नामजोशी वगैरे चालक मंडळींनी केसरी–मराठा ही वृत्तपत्रे काढली. केसरी मराठीतून, तर मराठा इंग्रजीतून निघत असे.

प्रथम आगरकर केसरी पहात व त्यातून लिहीत आणि टिळक मराठा पहात व त्यातून लेखन करीत.

अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता.

जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले.

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: राणी लक्ष्मीबाई यांची माहिती

कोल्हापूर संस्थानच्या बर्वे दिवाणावरील लेखांमुळे केसरी–मराठावर अब्रुनुकसानीची फिर्याद झाली आणि टिळक व आगरकर या संपादकद्वयाला १०१ दिवसांची कैद भोगावी लागली.

टिळकांनी केसरीतून एकापेक्षा एक असे अनेक सरस अग्रलेख लिहिले. त्यांच्या या प्रखर आणि ब्रिटिशांविरुद्ध लेखांबद्दलच्या राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तीन वेळा कारावास भोगावा लागला.

तथापि त्यांनी आपल्या लेखनविषयक धोरणात किंचितही बदल केला नाही. त्यामुळे केसरीचा खप झपाट्याने वाढला व तो लोकप्रिय झाला.

पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ‘ केसरी ‘ चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ‘ केसरी ‘ चा आत्मा होता.

१८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ‘, ‘ उजाडले पण सूर्य कुठे आहे ,’ ‘ टिळक सुटले पुढे काय ‘, ‘ प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ‘, ‘ टोणग्याचे आचळ ‘, ‘हे आमचे गुरूच नव्हेत ’, ‘ बादशहाब्राह्मण झाले ‘ हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.


तुम्हाला दिलेली लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak information in Marathi) यांची माहिती आवडली असेल.

हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद


Read More information : Lokmanya Tilak Wiki | Lokmanya Tilak vishwakosh

सायली जाधव यांची माहिती मराठीत - Sayali Sunil Jadhav Biography in Marathi

सायली जाधव यांची मराठीत माहिती – Sayali Jadhav Biography in Marathi

अंकुश चौधरी यांची माहिती - Ankush Choudhary Biography, Age, Family, information in Marathi

अंकुश चौधरी यांची माहिती – Ankush Choudhary information in Marathi