फुले नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. महात्मा फुले यांचा विवाह अवघ्या वयाच्या १३ व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला.
त्यांनी प्राथमिक शिक्षणाबरोबर काही काळ भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी १८४२ मध्ये पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : माता रमाबाई आंबेडकर यांची माहिती
बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. फुले यांनी १८४७ मध्ये इंग्रजी शिक्षण पूर्ण केले.
फुले हे करारी वृत्तीचे होते. त्यांना गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत.
परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विध्यार्थी म्हणून त्यांचा नाव लौकिक होते.
१८४८ मध्ये जेव्हा आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील तो क्षण खूप महत्त्वपूर्ण ठरला.
कारण, लग्नामध्ये मित्राच्या आई-वडिलांनी त्यांना तुच्च लेखले. खालच्या जातीचा म्हणून त्यांचा अपमान केला आणि लग्नाच्या सोहळ्यापासून दूर राहण्यास सांगितले.
या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी ठरवले कि, अशी जाती व्यवस्था मुळापासून मोडून काढायची.
सामाजिक कार्य – Mahatma Jyotiba Phule Social activism
संघटना | सत्यशोधक समाज |
प्रमुख्य कार्य | नीतिशास्त्र, मानवतावाद, शिक्षण, सामाजिक सुधारणा |
प्रमुख स्मारके | भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे |
भाषा | मराठी |
धर्म | हिंदू माळी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
सामाजिक कार्य – Mahatma Jyotiba Phule Social activism
फुले यांच्या सामाजिक कार्यात अस्पृश्यता, जातीव्यवस्था निर्मूलन, महिला, दलितांचे शिक्षण आणि पायदळी तुडवणाऱ्या महिलांचे कल्याण यासह अनेक बाबींचा समावेश होता.
शैक्षणिक कार्य – Educational work
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
१८४८ मध्ये, वयाच्या २३ व्या वर्षी फुले यांनी ख्रिश्चन मिशनरीज चालवलेल्या अहमदनगरमधील पहिल्या मुलींच्या शाळेत भेट दिली. त्यांनी १८४८ मध्ये थॉमस पेन यांचे मानव हक्क राइट्स ऑफ मॅन वाचले आणि त्यांच्या मनी सामाजिक न्यायाची तीव्र भावना निर्माण झाली.
त्यांना समजले की भारतीय समाजात दलित जातीतील महिला यांचे नुकसान होत आहे आणि त्यांचे शिक्षण त्यांच्या शोषण मुक्तीसाठी समाजामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून समाजातील सुधारणा करण्याचा निश्चय केला.
त्यामुळे त्यांनी १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा भिडे यांच्या वाड्यात पुणे या ठिकाणी चालू केली आणि शाळेची जबाबदारी फुले यांच्या पत्नी सावित्रीबाईं यांच्यावर सोपवली.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास
त्यानंतर त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी १८५२ मध्ये दुसरी शाळा वेताळ पेठ पुणे या ठिकाणी चालू केली. त्यांच्या या कार्यास सनातन लोकांकडून खूप त्रास झाला, पण कठोर बुद्धीचे महात्मा फुले यांनी माघार घेतली नाही.
जोतीरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी नेमणूक झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याच प्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओळखले होते कि, शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं माध्यम आहे कारण शिक्षणामुळेच समाजाला एक नवी दृष्टी देता येईल आणि समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा व सामाजिक भेद दूर करता येतील.
शिक्षणामुळे अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल, याची जाणीव महात्मा फुले यांना होती.