महात्मा ज्योतिबा फुले – Mahatma Jyotiba Phule information in Marathi
महिलांचे कल्याण – Women’s welfare
१८६३ मध्ये उच्च आणि गर्भवती विधवांसाठी सुरक्षित ठिकाणी जन्म देण्यासाठी अनाथ आश्रम सुरू केले. त्यांच्या अनाथाश्रमांची स्थापना बालहत्येचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नातून झाली.
१८६४ मध्ये पुण्यात गोखले बागेत विधवा महिलांसाठी पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
फुले यांनी अनाथ आश्रम उघडून कनिष्ठ जातींच्या आसपासच्या सामाजिक अस्पृश्यतेचा कलंक मिटविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या विहिरीचा उपयोग दलित जातीतील लोकांना पाणी देण्यासाठी केला.
सत्यशोधक समाज – Satyashodhak Samaj
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, शूद्र आणि दलित लोकांचे हक्क मिळवून देण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : कसा कोंढाणा किल्ला जिंकला तानाजी मालुसरे यांनी?
या चळवळीत सावित्रीबाई यांनी महिलांचे नेतृत्व केले, त्यांच्या बरोबर आणखी १९ महिलांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले.
पुण्यातील दीनबंधू या वृत्तपत्राने समाजाच्या विचारांना आवाज दिला. त्यांनी महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत हि चळवळ पोहचवली.
या चळवळीला छत्रपती शाहू महाराजांनी पाठींबा दिला. न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य खाली दिले आहे.
‘सर्वसाक्षी जगत्पती ।
त्याला नकोच मध्यस्ती ॥’
सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांची महत्वाची कामे संक्षीप्त स्वरूपात
✔ : शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा. – १८४८
✅ : शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग. – १८४९
✔ : मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण. – १८४९
✅ : चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना. – १८५१
✔ : थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास. – १८४७
✅ : मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला. – १८४८
✔ : भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. – १८४८
✅ : भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात. – १८५१
✔ : पूना लायब्ररीची स्थापना. – १८५२
✅ : वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. – १८५२
✔ : रात्रशाळेची सुरुवात केली. – १८५५
✅ : विधवाविवाहास साहाय्य केले. – १८६०
✔ : बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. – १८६३
✅ : गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. – १८६४
✔ : दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. – १८६८
✅ : सत्यशोधक समाजची स्थापना केली. – १८७३
✔ : शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर). – १८७५
✅ : स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले. – १८७५
✔ : पुणे नगर पालिकेचे सदस्य होते. – १८७६ ते १८८२
✅ : दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. – १८८०
✔ : ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. – १८८२
✅ : सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली. – १८८७
✔ : मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली. – १८८८
मृत्यू – Death
ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य ब्राह्मणांच्या शोषणापासून अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी वाहिले. उच्चवर्णीयांच्या गुलामगिरी विरुद्ध त्यांनी बंड केले.
२८ नोव्हेंबर, १८९० रोजी भारताचे महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले.
अशा प्रकारे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले(महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती – Mahatma Jyotiba Phule information in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏
More info : Wiki