in , ,

Mahesh Kothare Biography in Marathi – महेश कोठारे यांचे जीवनचरित्र

Mahesh Kothare Biography in Marathi - महेश कोठारे यांचे जीवनचरित्र

Mahesh Kothare Biography in Marathi – महेश कोठारे यांचे जीवनचरित्र

महेश कोठारे एक भारतीय अभिनेता असून, चित्रपट दिग्दर्शक आणि मराठी आणि हिंदी चित्रपटांचे निर्माता आहेत. त्यांनी अगदी लहान वयातच भारतीय चित्रपटात काम केले आहे आणि राजा और रंक, छोटा भाई, मेरे लाल, आणि घर घर की कहानी यासारख्या नामांकित चित्रपटांत काम केले आहे.

राजा और रंक या चित्रपटाच्या सुप्रसिद्ध हिंदी गाणे “तू कितनी अछि है, तू कितनी भोली है, ओ माँ…,” मास्टर महेशच्या भूमिकेत कोठारे महेश आहेत. महेश कोठारे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्रांतिकारक व्यक्तिमत्त्व मानले जाते.

धूमधाका (१९८५) या चित्रपटा मध्ये दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दची सुरुवात केली. त्यांनी २० वर्षांच्या कालावधीत बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे गाजविले .

Mahesh Kothare Short Biography in Marathi – महेश कोठारे थोडक्यात माहिती

पूर्ण नाव महेश कोठारे
जन्म सप्टेंबर २८, १९५७
जन्मस्थान बॉम्बे, बॉम्बे स्टेट, इंडिया
वडील अंबर कोठारे
पत्नीचे नाव नीलिमा कोठारे
नातेवाईक उर्मिला कानिटकर (सून)
राष्ट्रीयत्व भारतीय
व्यवसाय चित्रपट निर्माता,
चित्रपट दिग्दर्शक,
अभिनेता
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जय मल्हार
प्रमुख चित्रपट धूमधडाका,
दे दणा दण,
थरथराट,
धडाकेबाज,
झपाटलेला,
झपाटलेला २.
भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश,
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
स्क्रीन पुरस्कार

सुरुवातीचे जीवन – Mahesh Kothare life

महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते असून त्यांच्या वडिलांचे नाव अंबर कोठारे असे आहे. त्यांचा जन्म सप्टेंबर २८, इ.स. १९५७ रोजी बॉम्बे, म्हणजे मुंबई येथे झाला होता. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

त्यांच्या पत्नीचे नाव नीलिमा कोठारे आणि मुलगा आदिनाथ कोठारे. मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे यांची सून आहे. झपाटलेला २ मध्ये कोठारे यांचा मुलगा आदिनाथची मुख्य भूमिका होती. आदिनाथने मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकरशी लग्न केले आहे.

तुम्हाला माहित आहे का? महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले.

कारकीर्द – Mahesh Kothare Career

त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले “तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है” हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.

१९८० च्या दशकात कोठारे आणि आणखी एक युवा अभिनेता सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या दिग्दर्शनातून मराठी चित्रपटसृष्टीत क्रांती घडविण्यास मदत केली. पिळगावकर दिग्दर्शित नवरी मिळे नवऱ्याला, तर कोठारे यांनी धुमधाडका चित्रपट दिग्दर्शित केला.

कोठारे यांनी दिग्दर्शन केलेला धूमधडाका मध्ये अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे.

महेश कोठारे यांनी २७ जून २०१३ रोजी झपाटलेला – २ हा पहिला थ्रीडी मराठी चित्रपट बनविला, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हा चित्रपट १९९३ मध्ये झालेल्या झपाटलेला चित्रपटाचा दुसरा भाग होता. ज्यामध्ये तात्या विंचू नावाची एक बाहुली जिवंत आहे.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

काही मराठी चित्रपटांची नावे – Mahesh Kothare films

चित्रपट वर्ष
झापटलेला 2 2013
आयडियाची कल्पना 2010
पूर्ण ३ धमाल 2008
जबरदस्त 2007
शुभ मंगल सावधान 2006
खबरदार 2005
पछाडलेला 2004
खतरनाक 2000
माझा छकुला 1994
झपाटलेला 1993
धडकेबाज 1990
थरथराथ 1989
दे दना दन 1987
घर घर की कहानी 1981
राजा और रंक 1968

पुरस्कार आणि मान्यता – Mahesh Kothare Awards and recognitions

– सर्वश्रेष्ठ निर्देशक – फ़िल्म धूमधड़ाका (मराठी) – फ़िल्मफ़ेयर पुरस्कार – १९८६
– सर्वश्रेष्ठ फ़िल्म – फ़िल्म धूमधड़ाका (मराठी) – फ़िल्मफ़ेयर पुरस्कार – १९८६
– सर्वश्रेष्ठ निर्देशक 3 – फ़िल्म मज़ाक छकुला (मराठी) – महाराष्ट्र राज्य – १९९४
– सर्वश्रेष्ठ फ़िल्म 3 – फ़िल्म मज़ाक छकुला (मराठी) – महाराष्ट्र राज्य – १९९४
– सर्वश्रेष्ठ निर्देशक – फ़िल्म मज़ाक छकुला (मराठी) – स्क्रीन अवार्ड – १९९४
– सर्वश्रेष्ठ फ़िल्म – फ़िल्म मज़ाक छकुला (मराठी) – स्क्रीन अवार्ड – १९९४
– सर्वश्रेष्ठ निर्देशक – खटरनाक के लिए मराठी स्क्रीन अवार्ड (मराठी फिल्म 2000) – २००१
– सर्वश्रेष्ठ निर्देशक २ – फ़िल्म ख़बरदार (मराठी) महाराष्ट्र राज्य – २००७
– सर्वश्रेष्ठ पटकथा – फ़िल्म ख़बरदार (मराठी) महाराष्ट्र राज्य – २००७
– मराठी सिनेमा को उत्कृष्ट योगदान के लिए पुरस्कार – महाराष्ट्र राज्य – २००९


More info : Wiki


तुम्हाला दिलेली महेश कोठारे यांची माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

Ratan Tata Biography in Marathi - रतन नवल टाटा यांचे जीवनचरित्र

Ratan Tata Biography in Marathi – रतन नवल टाटा यांचे जीवनचरित्र

Sachin Pilgaonkar Biography in Marathi - सचिन पिळगांवकर यांचे जीवनचरित्र

Sachin Pilgaonkar Biography in Marathi – सचिन पिळगांवकर यांचे जीवनचरित्र