in ,

सुभाष चन्द्र बोस माहिती – Netaji Subhash Chandra Bose information in marathi

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती.

सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा.

त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही.

शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते.

अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

सुभाष चन्द्र बोस माहिती – Netaji Subhash Chandra Bose information in marathi

बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी

नेताजी जेव्हा विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली.

दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते.

२००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्धे

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.

१९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.

१९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.

नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.

सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.


More info : Wiki


तुम्हाला दिलेली सुभाष चन्द्र बोस(Netaji Subhash Chandra Bose information in marathi) यांची माहिती आवडली असेल.

हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

पंढरपुर विठ्ठलाची माहिती मराठी - Pandharpur vitthal information in marathi

पंढरपुर विठ्ठलाची माहिती मराठी – Pandharpur vitthal information in marathi

Siddhartha Jadhav Biography in Marathi - सिद्धार्थ जाधव यांची मराठीत माहिती

Siddharth Jadhav Biography in Marathi – सिद्धार्थ जाधव यांची मराठीत माहिती