पंढरपुर विठ्ठलाची माहिती मराठी – Pandharpur Vitthal information in marathi
विठोबा यांना विठ्ठल आणि पांडुरंगा म्हणून ओळखले जाते, विठोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत.
पांडुरंग हे साक्षात विष्णूचे द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहेत. विठ्ठलांना शास्त्र-पुराणांमध्ये बौध्य वा बोधराज असे म्हटले आहे.
पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत,
तरी आई-वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली, त्यावर उभे राहण्यासाठी.
पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली.
नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात!
विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने विट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख ” पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.” असा करतात.
पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात.
आलेले भाविक भीमा (चंद्रभागा) नदीमध्ये स्नान करतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.
विठोबाचे थोर भक्त
संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ विठोबाचे थोर भक्त १३ व्या ते १७ व्या शतकात होऊन गेले. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.
पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजा विधि
दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते.
सव्वाचार वाजता काकड्याला सुरवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते.
आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते.
त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते.
त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.
शेजारती
नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते.
प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्याला पागोटे बांधले जाते.
पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात.
देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात.
शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.
आळंदी-पंढरपूरची वारी
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात.
आळंदीहून संत ज्ञानेश्वर, सोपानदेवांची सासवडहून, मुक्ताईची एदलाबादहून आणि निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर, संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अश्या पालख्या पंढरपूरला येतात. काही शतके ही परंपरा चालत आली आहे.
या तीर्थक्षेत्राविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या-
११ व्या शतकात पंढरपूर मंदिर स्थापन केले गेले. मुख्य मंदिर १२ व्या शतकात देवगिरीच्या यादव शासकांनी बांधले होते. श्री विठ्ठल मंदिर हे पंढरपूर येथील मुख्य मंदिर आहे.
विष्णू देवाचे अवतार विठोबा आणि त्यांची पत्नी रुक्मणी यांच्या सन्मानार्थ पंढरपूर मध्ये वर्षातून ४ वेळा उत्सव साजरा केला जातो.
त्यापैकी आषाढ महिन्यात सर्वाधिक भाविक जमा होतात, तसेच कार्तिक, माघ आणि श्रावण महिन्यात. गेल्या ८०० वर्षांपासून सातत्याने तीर्थ यात्रा आयोजित केल्या जातात.
श्री कृष्णभक्त पुंडलिक हे आई वडिलांची सेवा करण्यात दंग होते, तेव्हा त्यांना दर्शन देण्यासाठी श्री कृष्ण दारा जवळ आले होते . पण पुंडलिक त्यावेळी वडिलांचे पाय दाबत होते.
त्या वेळी देवाला उभे राहण्यासाठी वीट सरकवली. देव कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले.
म्हणूनच पांडुरंगाची मूर्ती हि कमरेवर हात ठेवून उभी आहे.
येथे भगवान श्रीकृष्ण विठोबाच्या रूपात आहेत, भक्त पुंडलिकांच्या पितृभक्तीने प्रसन्न झाल्यामुळे ते पुंडलिकाने सरकवलेल्या विटेवर आनंदाने उभे राहिले. म्हणूनच त्याचे नाव ‘विठोबा’ पडले.
असे म्हटले जाते की विजयनगर साम्राज्याचा प्रख्यात राजा कृष्णदेव यांनी विठोबांची मूर्ती त्याच्या राज्यात घेऊन गेला होता, पण नंतर पुन्हा एका महाराष्ट्रातील भक्ताने परत आणली.
पंढरपूरची यात्रा आषाढ आणि कार्तिक शुक्ल एकादशीला होती. वारकरी संप्रदायाचे लोक येथे देवशयनी एकादशी ला दर्शनासाठी येतात.
दरवर्षी देवशायनी एकादशीनिमित्त लाखो लोक पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मणीच्या महापूजनासाठी एकत्र येतात.
या प्रवासादरम्यान काही लोक आळंदी येथे जमा होतात, आणि पुणे व जाजुरी मार्गे पंढरपूरला पोहोचतात.
ज्ञानदेव माऊलीची दिंडी म्हणून ओळखले जाते.
विठ्ठल आरती
आरती येथे पहा : श्री विठ्ठलाची आरती 🌺 Shree Vitthalachi Aarti आणि श्री पांडुरंगाची आरती
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
येथे पहा : आषाढी एकादशी
More info : Wiki
तुम्हाला दिलेली विठ्ठलाची(Pandharpur Vitthal information in marathi) माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद