Dr APJ Abdul Kalam information in Marathi Essay – डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची माहिती
देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ‘भारतरत्न’ ने सन्मानित डॉ ए. पी.जे. अब्दुल कलाम आझाद हे भारताचे प्रख्यात भारतीय वैज्ञानिक असून ते ११ वे पहिले राष्ट्रपती देखील होते, त्यांना “मिसाईल मॅन” म्हणून ओळखले जाते.
डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम आझाद यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रेरणादायक कल्पना तरुणांना पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतात.
कलाम जी यांच्या जीवनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि देशासाठी केलेल्या कामगिरी आणि योगदानाबद्दल मुलांना सांगण्यासाठी, शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये वारंवार परीक्षा किंवा निबंध लेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
अवुल पाकीर जैनउलाब्दीन अब्दुल कलाम हे एरोस्पेस वैज्ञानिक होते, त्यांनी २००२ ते २००७ पर्यंत भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले.
त्यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे झाला आणि त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला.
त्यांनी वैज्ञानिक आणि विज्ञान प्रशासक म्हणून डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) आणि इसरो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मध्ये चांगले योगदान दिले.
हे पण वाचा : कोंढाणा किल्ला जिंकणारे तानाजी मालुसरे
बॅलिस्टिक मिसाईल आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केलेल्या कामांसाठी ते भारतीय मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९९८ मध्ये भारताच्या पोखरण -२ अणु चाचण्यांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका निभावली होती, १९७४ मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली त्यामध्ये त्यांची भूमिका महत्तवाची होती.
आयुष्यात त्यांना खूप अडचणी संघर्ष असून देखील ते कधी डगमगले नाहीत. आणि आपल्या ध्येयावर दृढ राहिले आणि आयुष्यातील प्रगतीच्या मार्गावर चालत राहिले.
कलाम जी यांचे थोर विचार आणि त्यांचे भाषण जवानांच्या हृदयात जोश भरत होते. त्यांच्या दूरगामी विचारसरणीचा अंदाज त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकांतून आणि त्यांच्या महान कृतीतून काढता येतो.
ते म्हणाले की –
“सपने वो नहीं है जो आप सोते वक्त देखें, बल्कि सपने वो हैं जो आपको नींद नहीं आने दें”
स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र – A P J Abdul Kalam Marthi Biography (Wiki)
संपूर्ण नाव | अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम |
जन्म | १५ ऑक्टोबर १९३१ |
जन्मस्थान | रामेश्वरम, रामनाथपुरम जिल्हा, तामिळनाडू, भारत |
मृत्यू: | २७ जुलै २०१५ |
मृत्यूचे ठिकाण | शिलाँग, मेघालय, भारत |
वडिलांचे नाव | जैनुलाब्दीन |
आईचे नाव | अशिअम्मा |
पत्नी | – |
बहीण भाऊ | ५ |
व्यवसाय | वैज्ञानिक, एरोनॉटिकल इंजिनिअर |
धर्म | इस्लाम |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ए पी जे अब्दुल कलाम यांचे बालपण सुरुवातीचे जीवन – A P J Abdul Childhood
डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी पंबन बेटावरील रामेश्वरम या तीर्थक्षेत्रात तामिळनाडू राज्यात एक तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुलाब्दीन हे होडीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते;
त्यांची आई अशिअम्मा गृहिणी होती. कलाम यांना एक छोटी बहीण आणि चार भाऊ होते, त्यांच्यापैकी ते कुटुंबातील सर्वात लहान सदस्य होते.
तुम्हाला सांगतो कि, कलाम यांचे कुटुंब खूप गरीब होते, त्यामुळे कलाम यांनी अगदी लहान वयातच आपले घर चालवण्यासाठी वर्तमानपत्रे विकली.
जेव्हा कलाम ६ वर्षाचे होते, तेव्हा त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करून घर चालवत.
मुलाच्या शाळेचा खर्च कसे बसे भागवत होते. त्यासाठी त्यांनी बहिणेचे सोने गहाण ठेवले होते.
त्यांच्या वडिलांसोबत अहमद जलालुद्दीन नावाचा माणूस काम करत होता, नंतर त्याचे लग्न कलाम यांच्या बहिणीशी झाले.
जलालुद्दीन आणि कलाम हे चांगले मित्र बनले, जरी त्यांच्या वयात १५ वर्षाचा गॅप होता.
रामेश्वरम मध्ये जलालुद्दीन हे एकमेव व्यक्ती होते त्यांना चांगली इंग्लिश येत होती. त्यांनी कलाम यांना साहित्य, साइन्स आणि प्रसिद्ध लोकंबद्दल माहिती दिली.