Ramabai Ambedkar Biography in Marathi | Husband | Born | Father | Mother – रमाबाई आंबेडकर यांची माहिती
अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.
हे ऐकून रमाई यांना खूप दुःख झाले आणि रडायला लागल्या. स्वतःला सावरत आपल्या खोलीत गेल्या आणि आपल्या जवळ असलेला सोन्याचा डब्बा, हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून वराळे काका यांना दिल्या आणि म्हणाल्या, ह्या बांगड्या आणि डब्यातील सोने विकून किंवा गहाण ठेवून लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या, मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत.
वराळे काका त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात, लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. हे पाहून रमाई यांना खूप आनंद होतो.
त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना “रमाआई” म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाल्या.
गायक “मिलिंद शिंदे” यांचे सुंदर असे बोल.
“भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या… सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई |”
मृत्यू – Death
रमाई यांच्या शरीराची प्रकृती खूप खालावली होती त्यामुळे त्या आजारी पडल्या. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना त्यांचा आजार दाखिवला. पण त्यांचा आजार काही केल्या कमी होत नव्हता. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली.
पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली.
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था
मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, औरंगाबाद
रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली
माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
अशा प्रकारे आज आपण रमाई आंबेडकर (Ramabai Ambedkar Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏
More info : Wiki