in , , ,

रिंकू राजगुरू यांचे जीवनचरित्र – Rinku Rajguru Biography in Marathi

रिंकू राजगुरू यांचे जीवनचरित्र - Rinku Rajguru Biography in Marathi

रिंकू राजगुरू यांचे जीवनचरित्र – Rinku Rajguru Biography in Marathi

प्रेरणा महादेव राजगुरु हि एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. प्रेरणा ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही सैराट या गाजलेल्या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते.

सैराट या चित्रपट मध्ये अभिनयाची सुरुवात तिने आकाश ठोसर नटासोबत केली. साखर कारखान्याच्या श्रीमंत मालकाच्या घरी जन्मलेल्या परंतु धाडसी आणि निश्चयी अशा अर्चना पाटील उर्फ आर्चीची धडाकेबाज भूमिका अत्यंत नैसर्गिक अभिनयाने नटविल्याकारणाने सर्वत्र रिंकूचे कौतुक झाले.

सुरुवातीचे जीवन

रिंकू राजगुरूंचा जन्म ३ जून २००१ रोजी (प्रेरणा महादेव राजगुरू) महाराष्ट्रातील अकलूज या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महादेव राजगुरू. त्याचं दहावी पर्यंतच शिक्षण हे जिजामाता कन्या प्रशाला(अकलुज, जिल्हा-सोलापूर) या शाळेत झाले.

रिंकू राजगुरू यांचे जीवनचरित्र – Rinku Rajguru Biography in Marathi

पूर्ण नाव प्रेरणा महादेव राजगुरू
टोपण नाव रिंकू राजगुरू
जन्म ३ जून २००१ रोजी जन्म
जन्मस्थान अकलूज, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव महादेव राजगुरू
आईचे नाव आशा राजगुरू
भावाचे नाव शिधार्त राजगुरू
कार्यक्षेत्र अभिनेत्री
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट सैराट
आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित
आवडती अभिनेता नाना पाटेकर
राष्ट्रीयत्व भारतीय

कारकीर्द

2013 मध्ये तिने सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेतली आणि त्याने तिला सैराट या चित्रपटाच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी प्रसिद्ध झाली.

तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकूला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.

पुरस्कार

२०१७ मध्ये फिल्म सैराटसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार
२०१६ – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – सैराट चित्रपटासाठी विशेष उल्लेख (वैशिष्ट्य चित्रपट)
२०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार

रिंकूचे काही मराठी चित्रपटांची नावे

चित्रपट वर्ष
सैराट (मराठी) २०१६
मान्सू मिलान्गय (कन्नड) २०१७
कागर (मराठी) २०१९

More info : Wiki


अशा प्रकारे आज आपण रिंकू राजगुरू यांच्या बद्दल माहिती घेतली. हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

Uddhav Thackeray Biography in Marathi - उद्धव ठाकरे यांचे जीवनचरित्र

Uddhav Thackeray Biography in Marathi – उद्धव ठाकरे यांचे जीवनचरित्र

युवराज सिंग यांचे जीवनचरित्र - Yuvraj Singh Biography in Marathi

युवराज सिंग यांचे जीवनचरित्र – Yuvraj Singh Biography in Marathi