समर्थ रामदास स्वामी तपश्चर्या आणि साधना
वयाच्या १२ व्या वर्षी नारायण यांनी लग्न करावे अशी इच्छा त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केली होती, परंतु या लग्नामुळे ते अजिबात खूष नव्हते. लग्नाच्या दिवशी ते मंडपातून पळून गेले आणि त्यानंतर ते कधीही घरी परतले नाही.
त्यांनी नाशिक, महाराष्ट्र जवळील टाकळी या ठिकाणी उपासनास्थळ म्हणून निवड केली आणि वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. ही १२ वर्षे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशाच होय. त्यावेळी ते स्वतःला रामचा दास म्हणत, म्हणून त्यांचे नाव “रामदास” पडले.
त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना श्री रामाचा आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.
समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी पुढील १२ वर्षे भारतभ्रमण केले.
समर्थ रामदास स्वामी यांची तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण
भारत-भ्रमण करीत असता समर्थ रामदासांची भेट श्रीनगर येथे शीखांचे चौथे गुरु हरगोविंदजी यांच्याशी झाली.
गुरु हरगोबिंदजी त्यांना मुघल साम्राज्यातील लोकांच्या दुर्दशाविषयी सांगतात. सामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती, मुस्लिम राज्यकर्त्यांचा अत्याचार पाहून समर्थ रामदास अस्वस्थ झाले.
भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत.”समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती.
त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.
समर्थांनी गावोगावी ११ मारुतीची देवळे बांधली. त्यांचा असा विश्वास होता कि, मारुती ही शक्तीची देवता आहे.
त्यामुळे मारुती मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत.
या काळात त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकूण ११०० मठ आणि आखाड्यांची स्थापना केली.
रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट – Samarth Ramdas swami and Shivaji maharaj in marathi
भारत-भ्रमण च्या वेळी त्यांची भेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी झाली. शिवाजी महाराज स्वामी रामदास यांच्या गुणांनी अत्यंत प्रभावित झाले.
महाराजांनी त्यांना गुरु मानले आणि त्यांचे संपूर्ण मराठा राज्य दान केले. त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराज यांना म्हणतात, “हे राज्य तुझे किंवा माझे नाही.” हे राज्य श्री रामांचे आहे.
समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीनंतर शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेचे त्यांचे स्वप्न साकार केले आणि मराठा साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारतापर्यंत वाढवले.
मृत्यु – Samarth Ramdas Swami Death
गुरु रामदासांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण मराठा साम्राज्यात सातारा जवळील परळी येथील किल्ल्यावर घालवले. हा किल्ला आता सज्जनगड किल्ला म्हणूनही ओळखला जातो.
तमिळनाडूमधील अर्णिकार या अंध कारागीरच्या हाताने तयार केलेल्या भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीसमोर रामदास यांनी मृत्यूच्या अगोदर पाच दिवस उपोषण केले.
आणि पूर्व सूचना देऊन ते १९८१ च्या माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला ब्रह्मसमाधीत मग्न झाले. समाधीच्या वेळी ते ७३ वर्षांचे होते.
त्यांची समाधी ब्रह्मसमाधीच्या ठिकाणी संभाजी महाराजांनी सज्जनगड येथे समाधी मंदिर बांधले.
त्यांचा निर्वाण दिवस दास नवमी म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी लाखो भाविक देशाच्या काना कोपऱ्यातून येथे पोहोचतात आणि दर्शन घेतात.
Read More info : Samarth Ramdas Swami Wiki info
अशा प्रकारे आज आपण समर्थ रामदास स्वामी(Sant Samarth Ramdas Swami information in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏