in

सुप्रिया पिळगांवकर यांची माहिती – Supriya Pilgaonkar Biography Marathi

Supriya Pilgaonkar Biography Marathi - सुप्रिया पिळगांवकर यांची माहिती
Supriya Pilgaonkar Biography Marathi - सुप्रिया पिळगांवकर यांची माहिती

Supriya Pilgaonkar Biography Marathi – सुप्रिया पिळगांवकर यांची माहिती (Wiki, Age, Birth Date, Husband, Family, Movies and More)

सुप्रिया पिळगांवकर एक भारतीय मराठी अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक हिंदी, दूरचित्रवाणी, नाटक यामध्ये काम केले आहे. सुप्रिया पिळगावकर यांना बहुतेक चित्रपटात सुप्रिया या नावाने ओळखले जाते.

तुम्हाला माहीत असेलच, सुप्रिया पिळगांवकर यांच्या पतीचे नाव सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सचिन पिळगांवकर आहे. सुप्रिया पिळगावकर ही अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहे ज्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटविला आहे.

आज आपण सुप्रिया पिळगांवकर यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म (Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब (Family)? त्यांचे शिक्षण (Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.

सुप्रिया पिळगांवकर यांचे जीवनचरित्र – Supriya Pilgaonkar information in Marathi

अंक (Points) माहिती (Information)
नाव (Name) सुप्रिया पिळगांवकर
जन्म नाव सुप्रिया सबनीस
जन्म (Born) १७ ऑगस्ट, १९६७
जन्मस्थान (Birthplace) मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय (Age) वय ५२
वडिलांचे नाव
आईचे नाव
भाऊ-बहीण
वैवाहिक स्थिती विवाहित
पतीचे नाव (Husband Name) सचिन पिळगांवकर (सुप्रसिद्ध अभिनेता)
मुले (Supriya Pilgaonkar Daughter / Son) श्रिया पिळगावकर
कार्यक्षेत्र अभिनय (मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी, नाट्य)

सुप्रिया पिळगांवकर यांचे सुरुवातीचे जीवन – Supriya Pilgaonkar Early life

पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६७ रोजी मुंबई येथे, महाराष्ट्रातल्या ब्राह्मण कुटुंबात सुप्रिया सबनीस या नावाने झाला.

सुप्रिया पिळगांवकर यांचे लग्न आणि मुले– Supriya Pilgaonkar Marriage

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित असलेल्या “नवरी मिळे नवर्‍याला” या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी होते तेव्हा ते सुप्रिया यांना भेटले. त्यांचा “नवरी मिळे नवर्‍याला” हा चित्रपट हिट ठरला.

त्यानंतर सुप्रिया यांनी १९८५ मध्ये अभिनेता सचिन पिळगांवकरसोबत लग्न केले, जेव्हा सुप्रिया यांचे वय १८ होते. त्यांच्या मुलीचे नाव श्रीया पिळगावकर आहे. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहेत.

सुप्रिया पिळगांवकर यांचे शिक्षण – Supriya Pilgaonkar Education

त्यांचे पहिले नाव सुप्रिया सबनीस होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण ‘परांजपे विद्यालय’ मधून केले. वडिलांच्या प्रेरणेने ती लहानपणापासूनच वक्तृत्व आणि नाटक कार्यक्रमात नियमित भाग घ्यायची.

शुभा देशपांडे, अरविंद देशपांडे आणि सुधा करमरकर तिच्या बालपणीच्या विविध स्पर्धांमध्ये तिचे परीक्षक आणि मार्गदर्शक असायच्या.

हे पण वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित

सुप्रिया पिळगांवकर चित्रपट कारकीर्द – Supriya Pilgaonkar career

पिळगावकर यांनी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे; त्यापैकी सर्वात लोकप्रिय आहेत तू तू मैं मैं, कुछ रंग प्यार के ऐसे भी, ससुराल गेंदा फूल, राधा की बेटियां कुछ कर दिखायेंगी आणि कडवी खट्टी मीठी.

कॉमेडी सीरियल ‘तू तू में मैं’ मध्ये सुप्रिया यांनी सून म्हणून साकारलेल्या भूमिकेतही अजूनही आठवतात. एक सासू आणि सून यांच्यातील मतभेद आणि आपुलकी यावर विनोदी नजारा होता.

सुप्रिया यांनी सचिनबरोबर ‘नवरी मिळे नवर्‍याला’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘गंमत जंमत’ अशा अनेक चित्रपटांत जोडीने अभिनय केला आहे व त्यांना खूप मोठे यश मिळाले.

इतकेच नव्हे तर सुप्रिया यांनी ऐतबार, आवारा पागल दीवाना, तुझे मेरी कसम, बरसात, दीवाने हुए पागल आशा अनेक हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.

सुप्रिया तिच्या पतीसह पहिल्या सत्रात ‘नच बलिये’ या डान्स शोचीही विजेती ठरली आहे. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या मदतीने सुप्रिया यांनी लाखो प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले आहे.

सुप्रिया पिळगांवकर यांच्या चित्रपटांची यादी – Supriya Pilgaonkar Movies

टीवी सीरियल : क्षितिज ये नहीं, तू तू मैं मैं, कभी बीवी कभी जासूस, तू तोता मैं मैना, कड़वी खट्टी मीठी, राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी, बसेरा, ससुराल गेंदा फूल, लाखों में एक, एक ननद की खुशियों की चाबी मेरी भाभी, दिल्ली वाली ठाकुर गर्ल्स, कुछ रंग प्यार के ऐसी भी, मेरे साई – श्रद्धा और सबुरी, इश्कबाज़

मराठी चित्रपट : नवरी मिळे नवऱ्याला, अशी हि बनवा बनवी, माझा पती करोडपती, आयत्या घरात घरोबा, गम्मत जम्मत, कुंकू, नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, एकुलती एक, खरं सांगायचं तर,

हिंदी चित्रपट : खूबसूरत, आवारा पागल दीवाना, तुझे मेरी कसम, ऐतबार, टाइम पास, बरसात, दीवाने हुए पागल, जाने कहाँ से आयी है,

सुप्रिया पिळगांवकर यांना मिळालेले पुरस्कार – Supriya Pilgaonkar Awards

२००२ २०१० – भारतीय दूरदर्शन अकादमी पुरस्कार कॉमिक रोल मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
२०१० – इंडियन टेली अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सुवर्ण पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
२०१७ – लायन्स गोल्ड पुरस्कार
२०१८ – भारतीय दूरदर्शन अकादमी पुरस्कार
२०१९ – आयरिल पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाटक)

सोशल मीडिया – Social media accounts

सुप्रिया पिळगांवकर यांचे सोशल मीडियाची माहिती खाली दिली आहे.

इंस्टाग्राम (Supriya Pilgaonkar instagram) @supriyapilgaonkar
फेसबुक (Supriya Pilgaonkar facebook)
ट्विटर (Supriya Pilgaonkar twitter)
विकिपीडिया (Supriya Pilgaonkar Wiki) सुप्रिया पिळगांवकर

अशा प्रकारे आज आपण सुप्रिया पिळगांवकर(Supriya Pilgaonkar Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली. हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा, धन्यवाद MarathiBiography.com

Akshay Kumar Biography Marathi - अक्षय कुमार यांची माहिती

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यांची माहिती – Akshay Kumar Biography marathi

Gautami Deshpande Biography Marathi - गौतमी देशपांडे यांची माहिती

गौतमी देशपांडे यांची माहिती – Gautami Deshpande Biography Marathi