Swapnil Joshi Biography in Marathi – स्वप्नील जोशी यांचे जीवनचरित्र
स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपट-अभिनेता आहे. याने हिंदी व मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे. त्यांचा दुनियादारी हा चित्रपट लोकांना खूप आवडला.
वयाच्या नवव्या वर्षी, स्वप्नील जोशी याने रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण‘ या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात छोट्या रामपुत्र कुशची भूमिका साकारली. तेथूनच स्वप्नीलची अभिनयाची कारकीर्द सुरू केली.
Swapnil Joshi Short Biography in Marathi – स्वप्नील जोशी थोडक्यात माहिती
नाव | स्वप्नील जोशी |
पत्नीचे नाव | अपर्णा(२००५ – २००९ घटस्फोटित), लीना |
जन्म | १८ ऑक्टोबर, १९७७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
विशेषता | अभिनेता ( चेकमेट (चित्रपट), टार्गेट, मुंबई-पुणे-मुंबई ) |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्लिश, |
प्रसिद्ध चित्रपट | चेकमेट, टार्गेट, मुंबई-पुणे-मुंबई, दुनियादारी |
पुरस्कार | जियो फिल्मफेअर अवॉर्ड्स |
सुरुवातीचे जीवन – Swapnil Joshi life
स्वप्नील जोशी यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी आपले शिक्षण ब्य्राम्जी जीजीभोय या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण सिदेन्हाम कॉलेज, चर्चगेट वाणिज्य या विषयातून पूर्ण केले.
स्वप्निल ने २००५ मध्ये अपर्णा बरोबर लग्न केले. त्यांचा प्रेमविवाह होता पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अर्पणा ही व्यवसायाने डेंटिस्ट आहे. १६ डिसेंबर २०११ मध्ये औरंगाबादमधील ताज हॉटेल मध्ये लीना अराध्य बरोबर त्याचे लग्न झाले. ती सूद्धा व्यवसायाने डेंटिस्ट आहे.
व्यावसायिक जीवन – Swapnil Joshi Career
२०१० मध्ये त्यांनी मुक्ता बर्वेच्या समवेत मुंबई-पुणे-मुंबई हिट, रोमँटिक चित्रपटात पुण्यातील मुलाची मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटातील बर्वेबरोबरच्या त्याच्या केमिस्ट्रीची तुलना शाहरुख खान आणि काजोल यांच्या तुलनेत केली गेली.
२०१२ मध्ये, त्याने सब टीव्हीवरील कॉमेडी शो गोलमाल है भाई सब गोलमाल है वर सचिनची मुख्य भूमिका साकारली होती.
त्यांनी दुनियदारीमध्ये सई ताम्हणकर यांच्यासमवेत श्रेयस तळवलकर यांची भूमिका साकारली.
काही मराठी चित्रपटांची नावे – Swapnil Joshi films
चित्रपट | वर्ष |
---|---|
गुलाम-ए-मुस्तफा | 1997 |
दिल विल प्यार व्यार | 2002 |
चेकमेट | 2008 |
टार्गेट | 2008 |
आम्ही सतपुते | 2009 |
मुंबई-पुणे-मुंबई | 2010 |
दुनियदारी | 2013 |
गोविंदा | 2013 |
मंगलाष्टक वन्स मोअर | 2013 |
प्यार वालीची लव्ह स्टोरी | 2014 |
मितवा | 2015 |
मुंबई-पुणे-मुंबई 2 | 2015 |
मुंबई पुणे मुंबई 3 | 2018 |
मोगरा फुलला | 2019 |
More info : Wiki
तुम्हाला दिलेली स्वप्नील जोशी यांची माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद