Udayanraje Bhosale Biography in Marathi – उदयनराजे भोसले यांची माहिती –
श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत. उदयनराजे भोसले छत्रपतींच्या साताऱ्याच्या गादीचे वंशज आहेत.
महाराष्ट्रातील जनता आजही त्यांच्याकडे छत्रपती म्हणूनच पहाते व त्याप्रमाणे आदर देते. जेव्हा ते बोलतात तेव्हा, त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत नाही अगदी सातार्यातल्या पत्रकारांचीही नाही.
हे पण वाचा : संत गाडगे बाबा यांचे सुविचार
सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : राणी लक्ष्मीबाई यांची माहिती
तसेच उद्यानराजे भोसले हे एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रतिनिधीत्व करणारे १७ व्या लोकसभेचे माजी सदस्य आहेत.
उदयनराजे भोसले यांचे जीवनचरित्र – Udayanraje Bhosale information, Biography, Life, Age, Education, Family
अंक (Points) | माहिती (Information) |
---|---|
पूर्ण नाव (Name) | उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले |
अन्य नाव | – |
जन्म (Born) | २४ फेब्रुवारी १९६६ |
जन्मस्थान (Birthplace) | नाशिक, महाराष्ट्र, भारत |
वय (Age) | ५३ वर्षे २०२० पर्यंत |
मूळ गाव | – |
वडिलांचे नाव | श्री प्रतापसिंग महाराज भोसले |
आईचे नाव | श्रीमती. कल्पनाराजे भोसले |
भाऊ-बहीण | – |
वैवाहिक स्थिती (Marital Status) | विवाहित |
जोडीदाराचे नाव (Wife Name) | श्रीमती. दमयंतीराजे भोसले |
अपत्ये | एक मुलगा आणि मुलगी |
सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Udayanraje Bhosale Personal Life Information, family and early life
उदयनराजे भोसले यांचा जन्म नाशिकमध्ये २४ फेब्रुवारी १९६६ ला झाला. त्यांचं प्रार्थमिक शिक्षण देहरादूनला झालं. त्यांचं शिक्षण सुरु असतांनाच वडील प्रतापसिंह भोसले यांचं निधन झालं.
उदयनराजेंच्या आई अर्थात श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह महाराज भोसले सातार्याच्या जलमंदिर वाडय़ात राहतात.
आणि उदयनराजे यांनी पुढचं शिक्षण पाचगणिला पूर्ण केलं. उदयनराजे यांनी पुण्यातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. तर इंग्लंडमधून एमबीए केलं.
‘माझ्या आईवडिलांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी मला अगदी पहिलीपासूनच शिक्षणासाठी हॉस्टेलवर ठेवलं. त्यामुळे राजघराण्याच्या वारशाचं ओझं मला लहानपणी कधी जाणवलंच नाही.
मी इतरांपेक्षा वेगळा आहे असंही कधी वाटलं नाही. शाळेत जो मला चॉकलेट द्यायचा तो माझा मित्र! राजेशाहीपासून मी खूपच लांब होतो,’ उदयनराजे सांगत होते.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : पंकजाताई मुंडे यांची माहिती
त्यांनी २० नोव्हेंबर २००३ रोजी दमयंतीराजे यांच्याशी लग्न केले. उदयनराजेंची पुढची पिढी त्यांचा मुलगा वीरप्रतापसिंहराजे आणि एक मुलगी आहे.
राजकारणात पडण्यापूर्वी रेसिंगमध्येच करीअर करायचे असे त्यांचे स्वप्न होते, पण ते काही जमून आलं नाही. हॉर्स रायडिंग, कार ड्रायव्हिंग त्यांच्या आवडी असल्या तरी राजे यांचे साधे असे राहणीमान आहे. ‘जीन, त्यावर एखादा कॅज्युअल शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल’ हा महाराज साहेबांचा फेवरेट ड्रेसकोड!
उदयनराजे भोसले छंद – Udayanraje Bhosale Hobbies
भोसले यांचे छंदही राजासारखेच आहेत. त्यांना फॉर्म्युला वनची आवड आहे. वेगाने गाडी चालवणे त्यांना आवडत. आणि सातारा ते पुणे अंतर ३५ मिनीटांत पार करू शकतो असा त्यांचा दावाही आहे. शिवाय त्यांना बॉक्सींगचीही आवड आहे.
उदयनराजे भोसले यांचे कार्य, भूमिका, – Udayanraje Bhosale Political info
अंक (Points) | माहिती (Information) |
---|---|
कार्यक्षेत्र | राजकारणी, समाजकार्य |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी (१४ सप्टेंबर २०१९ पर्यंत) |
भाषा | मराठी |
धर्म | हिंदू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
उदयनराजे भोसले राजकीय प्रवास – Political journey of Udayanraje Bhosale
१९९० मध्ये उच्चाशिक्षण घेईन इंग्लंडमधून परतल्यानंतर, उदयनराजे यांनी राजकीय वर्चस्वासाठी लोकशाहीचा म्हणजेच निवडणुकीच्या राजकारणाचा मार्ग स्वीकारला. आणि निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली.
१९९१ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडूण आले. १९९६ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उदयनराजेंनी निवडणूक लढवली, पण त्यांच्या वाटय़ाला पराभव आला.
त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि १९९८ च्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उदयनराजे निवडून आले, आणि त्या वेळी युतीच्या सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आलं. १९९८-९९ मध्ये उदयनराजे भोसले राज्याचे महसूल राज्यमंत्री होते.
भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंशी उदयनराजेंची खास जवळीक होती. पण जेम्स लेन प्रकरणी भाजपनं योग्य भूमिका घेतली नाही. असा आरोप करत उदयनराजे भाजपमधून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली.
✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : मुक्ता बर्वे यांची माहिती
ते महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रतिनिधीत्व करणारे १७ व्या लोकसभेचे माजी सदस्य आहेत.
२००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले.
२०१९ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघातून सदस्यत्वाचा राजनामा देत ते पुन्हा भारतीय जनता पक्षात गेले. परंतु झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी १४ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे.
थोडक्यात राजकीय प्रवास
- १९९८-९९ :- विधानसभेवर निवड, राज्याचे महसूल राज्यमंत्री
- २००९ :- लोकसभेवर निवड
- २००९ :- विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचे सदस्य, पर्यावरण समितीचे सदस्य
- २०१० :- रसायण आणि खते समितीचे सदस्य
- २०१४ :- पुन्हा लोकसभेवर निवड
- २०१९ :- सदस्य, कामगार स्थायी समिती, सल्लागार समिती, स्टील व खाण मंत्रालय
- २०१९ :- तिसऱ्यांदा १७ व्या लोकसभेवर पुन्हा निवड
- १४ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या खासदारपदाचा राजीनामा
सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य
सातारा जिल्ह्यात आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातही शिवजयंती महोत्सवाचे आयोजन; विविध संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य
अधिकृत सोशल मीडिया खाते – Udayanraje Bhosale Official Social media accounts
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/chhatrapati.udayanraje.bhosale/
फेसबुक : https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/
ट्विटर : https://twitter.com/udyanbhosale/
अशा प्रकारे आज आपण उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.
हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏
Reference : Udayanraje Bhosale Wiki info | Udayanraje Bhosale info