in , , ,

Uddhav Thackeray Biography in Marathi – उद्धव ठाकरे यांचे जीवनचरित्र

Uddhav Thackeray Biography in Marathi - उद्धव ठाकरे यांचे जीवनचरित्र

Uddhav Thackeray Biography in Marathi – उद्धव ठाकरे यांचे जीवनचरित्र

उद्धव जी ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. इ.स. २००३ साली उद्धव ठाकरेंचे वडील – शिवसेनासंस्थापक व तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे – यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाथी देण्यात आली.

आपण सर्वांना माहित आहे, उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

सुरुवातीचे जीवन

ठाकरे यांचा जन्म २ जुलै १९६० रोजी मुंबई या ठिकाणी त्यांचे वडील हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या तीन मुलांपैकी सर्वात धाकटा म्हणून झाला.

उद्धव ठाकरे यांचे वडील हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.

Uddhav Thackeray Biography in Marathi – उद्धव ठाकरे यांचे जीवनचरित्र

पूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे
जन्म २ जुलै १९६० रोजी जन्म
जन्मस्थान मुंबई , महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव बाळासाहेब ठाकरे
आईचे नाव मीनाताई ठाकरे
पत्नीचे नाव रश्मीताई ठाकरे
अपत्ये आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे
राजकीय पक्ष शिवसेना
निवास स्थान मातोश्री,बांद्रा, मुंबई, महाराष्ट्र, भारत.
मुख्य संपादक सामना
राष्ट्रीयत्व भारतीय

वैयक्तिक जीवन – Uddhav Thackeray’s personal life

उद्धव ठाकरे यांचे रश्मीताई ठाकरे यांच्याशी लग्न झाले असून आदित्य आणि तेजस असे त्यांना दोन मुले आहेत. त्याचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. आदित्य ठाकरे हे आमदार म्हणून निवडून आले. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी मुंबईच्या वरळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आमदारकीसाठी निवडणूक लढविली आणि ते आमदार म्हणून विजयी झाले.

राजकीय कारकीर्द – Uddhav Thackeray’s political career

आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कधीही संवैधानिक पद स्वीकारला नसले, तरी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी नव्याने झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. धन्यवाद🙏🙏🙏


More info : Wiki


टीप: Marathi Biography बरोबर आणि अचूकतेसाठी कठोर परिश्रम करतो. कृपया वरील दिलेल्या लेखात काही चुकीचे आढळल्यास आणि तुमच्या कडे त्याबद्दल काही माहिती असल्यास तुम्ही आम्हाला या लेखातील सुधारणांबद्दल मदत करा. धन्यवाद!!!

Nana Patekar Biography in Marathi - नाना पाटेकर यांचे जीवनचरित्र

Nana Patekar Biography in Marathi – नाना पाटेकर यांचे जीवनचरित्र

रिंकू राजगुरू यांचे जीवनचरित्र - Rinku Rajguru Biography in Marathi

रिंकू राजगुरू यांचे जीवनचरित्र – Rinku Rajguru Biography in Marathi