युवराज सिंग यांचे जीवनचरित्र – Yuvraj Singh Biography in Marathi
युवराज सिंग हे भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत. आपण युवराज सिंग यांच्या जीवन विषयी माहिती जाणून घेऊया.
२००० सालापासुन युवराज भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. त्यांनी पहिला कसोटी सामना २००३ मध्ये खेळला. ते २००७ ते २००८ पर्यंत भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होते. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्यांना मालिकावीर म्हणून घोषित केले.
त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होता. त्यांनी २०११ मध्ये कर्करोगाच्या गाठीचा उपचार करून घेतला. केमोथेरपी चा उपचार त्यांनी इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन या ठिकाणी केला. त्यांचा हा उपचार २०१२ मध्ये पूर्ण झाला आणि ते एप्रिल महिन्यात भारतामध्ये परत आले.
युवराज सिंग यांचे जीवनचरित्र – Yuvraj Singh Biography in Marathi
पूर्ण नाव | युवराज सिंग |
टोपण नाव | युवी |
जन्म | 12 डिसेंबर, 1971 चंदीगड, भारत |
जन्मस्थान | चंदीगड, भारत |
वडिलांचे नाव | योगराज सिंग |
आईचे नाव | शबनम सिंग |
विशेषता | फलंदाज |
फलंदाजीची पद्धत | डावखोरा |
गोलंदाजीची पद्धत | डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स |
भूमिका | आलराउंडर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
सुरुवातीचे जीवन – Early life
युवराज हा जट सिख परिवारातून येतो. योगराज सिंग आणि शबनम सिंग हे त्यांचे आई-वडिल आहेत. टेनिस आणि रोलर स्केटिंग बालपणामध्ये युवराजच्या आवडत्या क्रीडा होत्या. त्याने चंदीगड मध्ये डि.ए.व्हि. सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतले.
कारकीर्द – Career
युवराज सिंग प्रथमच कूच-बिहार ट्राफी स्पर्धेत चर्चेत आला होता, जेव्हा त्याने पंजाब क्रिकेट संघाकडून खेळताना ३५८ धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला सन २००० मध्ये अंडर १९ विश्वचषकात भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्या वर्षी भारतानेही ती स्पर्धा जिंकली.
सन २००० मध्ये युवराजची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. आयसीसी नॉक-आउट ट्रॉफी दरम्यान त्याने केनियाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. या मालिकेच्या दुसर्या सामन्यात युवीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॅटचा स्फोटकपणा दाखवला.
१९ सप्टेंबर २००७ रोजी २०-२० क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना जोहान्सबर्ग येथे एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.
यश आणि पुरस्कार – Achievements and honours
-
- २००७ च्या आयसीसी वर्ल्ड टी -20 सामन्यात त्याने एका ओव्हर मध्ये सहा षटकार ठोकले.
- २००७ आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी -२० दरम्यान इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुध्द १२ चेंडूत ५० धावा केल्यामुळे त्यांना वेगवान टी २० अर्धशतकाचा विक्रम केला.
- ३०० प्लस अधिक धावा करणारा आणि एकाच विश्वचषकात १५ बळी (विकेट्स) घेणारा तो पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला.
- आयसीसी(ICC) क्रिकेट विश्वचषक २०११ मध्ये तो सामनावीर ठरला.
- २०१२ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना अर्जुन पुरस्काराने (भारताचा दुसरा सर्वोच्च, क्रीडा पुरस्कार) सन्मानित केले.
- ऑगस्ट २०१८ मध्ये पॉवर ब्रॅण्ड्सने युवराजसिंगला भारतीय मानवता विकास पुरस्कार देण्यात आला. कारण त्यांची मैदानातील प्रभाव खेळाडू म्हणून आणि लोंकांबद्दल नम्रता दाखविल्याबद्दल आणि कर्करोगाविरूद्ध त्यांची लढाई म्हणून.
- २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
- फेब्रुवारी २०१४ मध्ये, त्यांना एफआयसीसीआयच्या(FICCI) सर्वाधिक प्रेरणादायक स्पोर्ट्सपर्सन ऑफ द ईयर पुरस्काराने गौरविण्यात आले.
More info : Wiki
अशा प्रकारे आज आपण युवराज सिंग यांच्या बद्दल माहिती घेतली. हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏